ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 1 - नऊ वर्षापूर्वीच्या सुनील जोशी हत्या प्रकरणात देवास न्यायालयाने बुधवारी साध्वी प्रज्ञा सिंहसह आठ आरोपींची निर्दोष मुकत्तता केली. देवासमध्ये 29 डिसेंबर 2007 रोजी दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी गोळया झाडून सुनील जोशीची हत्या केली होती. माजी आरएसएस प्रचारक असलेला सुनील जोशी त्यावेळी काँग्रेस नेत्याच्या हत्ये प्रकरणी फरार होता.
2011 मध्ये एनआयएकडे जोशी हत्या प्रकरणाचा तपास सुपूर्द करण्यात आला. तीनवर्षांनी एनआयएने भोपळ येथील विशेष कोर्टात या प्रकरणी आरोपपत्र सादर केले. जोशीच्या हत्येमागे मोठा कट असल्याची शक्यता एनआयएने त्यावेळी फेटाळून लावली.
आणखी वाचा
सप्टेंबर 2014 मध्ये देवासमध्ये खटल्याची सुनावणी सुरु झाली. सप्टेंबर 2015 मध्ये सत्र न्यायालयाने साध्वी प्रज्ञा आणि अन्य सात जणांविरोधात आरोप निश्चित केले. न्यायालयाने बुधवारी निकाल दिला त्यावेळी आठ पैकी पाच आरोपी कोर्टात हजर होते. साध्वी प्रज्ञावर भोपाळ येथील रुग्णालयात उपचार सुरु असल्याने ती निकालाच्या दिवशी न्यायालयात उपस्थित राहू शकली नाही.