इंदूर :
रामबाग दादावाडीत १८ वर्षांपासून राहत असलेल्या साध्वी विमलयशा यांनी ३९ वर्षांपासून अन्नाचा कण खाल्लेला नाही. त्या दिवसभरात केवळ दोन कप चहा घेतात. तरीही त्या पूर्णपणे निरोगी आहेत. ६२व्या वर्षीही त्यांना कोणताही आजार नाही. चहामुळे लोक नेहमीच असिडिटीची तक्रार करतात. पण साध्वी विमला यांना कधीच याचाही त्रास झाला नाही.
खरतरगच्छ श्री संघच्या विमलयशा श्रीजी मसा ह्या याला संकल्पाच्या शक्तीचा चमत्कार असल्याचे सांगतात. त्या सकाळी ७.३० वाजता आणि ११.३० ते दुपारी १२ च्या दरम्यान दुसऱ्यांदा चहा घेतात. त्या दुपारी ३ नंतर पाणीसुद्धा घेत नाहीत, त्या सांगतात की, संयम, त्याग हाच जीवनातील सर्वात मोठा संकल्प असल्याचे त्या सांगतात. त्या म्हणतात की, आमचे जीवन त्यागमयी आहे. साधू जीवन आहे. जितका त्याग करू तेवढेच पुढे जाऊ. मनात जेव्हा काही खाण्याची लालसा राहते तेव्हा कठीण होते, मन भटकते, पण भटकत्या मनाला रोखणे हे आपल्याच हातात असते. जोपर्यंत मन मान्य करत नाही तोपर्यंत कोणतेही कार्य होत नाही आणि जेव्हा मन तयार तेव्हा कठीण कामही सहज होऊन जाते. खरतरगच्छ श्री संघचे प्रचार सचिव योगेंद्र सांड यांनी सांगितले की, या अनोख्या तपामुळे त्यांची ख्याती चहावाली म. सा. नावाने आहे. त्यांनी १४ मे १९७५ रोजी अक्षय तृतीयेला दीक्षा घेतली होती.
डॉक्टरही संभ्रमात : दिवसभर कशा राहतात उत्साही
- साध्यींची वैद्यकीय तपासणी करणारे फिजिशियन डॉ. रुपेश मोदी सांगतात की, त्या ६२व्या वर्षीही पूर्णपणे निरोगी आहेत. त्यांना कोणताही आजार नाही. त्या पूर्ण दिवस केवळ दोन कप चहा घेऊन राहतात तरीही दिवसभर उत्साही असतात, प्रवचन देतात, फिरण्यामुळेही त्यांच्या आरोग्याला काही बाधा होत नाही.
- डॉ. मोदी म्हणतात की, दोन कप चहानंतर १८ ते १९ तासांचा उपवास होतो. हे इंटर मिटेंट फास्टिंग (अधूनमधून खंडित होणारा उपवास) श्रेणीत एक कप चहात जवळपास १५० कॅलरी असतात. म्हणजेच, दोन कप चहातून शरीराला ३०० कॅलरी मिळतात. चहा हा रोगप्रतिकारक प्रणालीला चालना देतो. कॅन्सर आणि हृदयरोगातही संरक्षण देतो. चयापचय चांगले राहते. चहासोबत अन्य केमिकल, कार्बोहायड्रेटने अॅसिडिटी होते, अन्यथा होत नाही. आध्यात्मिक शक्तीनेही सकारात्मक हार्मोन शरीराला ऊर्जा देतात. साध्वीजीनी जो अंगीकार केला आहे त्यामुळे त्यांना भोजनाची आवश्यकता वाटत नाही..