शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

साध्वींना हाकला !

By admin | Published: December 04, 2014 3:36 AM

संसदेच्या दोन्ही सभागृहांत एकजूट झालेल्या विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला़ साध्वींची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची आणि पंतप्रधानांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली़

हरीश गुप्ता, नवी दिल्लीकेंद्रीय मंत्री साध्वी निरांजन ज्योती यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून बुधवारीही संसदेच्या दोन्ही सभागृहांत एकजूट झालेल्या विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला़ साध्वींची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची आणि पंतप्रधानांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली़ सरकारने मात्र साध्वींनी काल दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हा मुद्दा संपल्याचे सांगून विरोधकांची ही मागणी धुडकावून लावली़ या गोंधळामुळे दोन्ही सभागृहांतील कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले़ तशात राष्ट्रवादी काँग्रेसनेही तटस्थतेचा त्याग करीत विरोधकांना बळ दिल्याने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.> शरद पवार नव्या आघाडीच्या शोधातआंदोलनात भागआतापर्यंत या मुद्द्यावरून अलिप्तता बाळगणारा राष्ट्रवादीही आता राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांना मंत्रिपदावरून हटविण्याची मागणी केली आहे. आम्ही साध्वीच्या राजीनाम्याची मागणी केली असून, आम्ही साध्वीविरुद्धच्या आंदोलनाचा भाग आहोत, असे राष्ट्रवादीचे खासदार डी. पी. त्रिपाठी यांनी स्पष्टपणे सांगितले. > राष्ट्रवादीने पवित्रा बदलण्याची कारणेआता शिवसेना महाराष्ट्रात भाजपा सरकारमध्ये सामील होणार असल्याकारणाने राष्ट्रवादीने नवी भूमिका शोधण्यास सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात काँग्रेसला सोबत घेऊन नवी संयुक्त आघाडी स्थापण्याचा प्रयत्न करेल, असे सूत्रांनी म्हटले आहे. साध्वी मुद्द्याने या सर्व पक्षांना एकत्र येण्याची संधी दिली आहे. > महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना यांनी हातमिळवणी केल्यामुळे राष्ट्रवादी आता समविचारी पक्षांच्या ऐक्यासाठी प्रयत्न करणार असून, शरद पवार हे या एकीकरणाच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. त्याचवेळी समाजवादी पार्टी, संयुक्त जनता दल, राजद, भारालोद आणि धर्मनिरपेक्ष जनता दल या पक्षांच्या नेत्यांनी नव्या आघाडीचा विचार करण्यासाठी गुरुवारी दुपारी एक बैठक बोलावलेली आहे.