सईद यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. ते अनेक वर्षे आमचे सहकारी राहिले. राजकीय चातुर्य आणि दृष्टिकोनाबद्दल ते ओळखले जात. त्यांच्या जाण्यामुळे समाजातील तळागाळाशी जोडला गेलेला एक नेता देशाने गमावला .- राष्ट्रपती प्रणव मुखर्जीएक लोकप्रिय नेता आणि मुत्सद्दी गमावला आहे. जम्मू-काश्मीरची प्रगती आणि कल्याणासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. ते सहमती घडवून आणणारे नेते होते. - उपराष्ट्रपती हमीद अन्सारीसर्वसामान्य विशेषत: उपेक्षित घटकांबाबत असलेल्या प्रेमामुळे ते ओळखले जात. जम्मू-काश्मीरसंबंधी गुंतागुंतीच्या मुद्यांचा त्यांचा चांगला अभ्यास होता.- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्रीसईद सच्चे देशभक्त होते. त्यांनी संपूर्ण आयुष्य जम्मू-काश्मीरच्या कल्याणासाठी व्यतित केले. - नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूकमंत्रीसईद हे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि प्रभावी प्रशासक होते. त्यांच्या जाण्यामुळ देशाचे अपरिमित नुकसान झाले आहे.- अमित शहा, भाजपचे अध्यक्षसईद यांच्या जाण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आपण समाजाच्या दु:खावर फुंकर घालणारा नेता गमावला आहे. ते मुत्सद्दी नेते होते. - पंतप्रधान नरेंद्र मोदीसईद यांच्या निधनामुळे केवळ जम्मू-काश्मीरच नव्हे, तर संपूर्ण देशाने एक थोर नेता गमावला आहे. त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन आणि त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील.- सोनिया गांधीमुफ्ती मोहंमद सईद यांची राजकीय कारकीर्द१९५० मध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश.१९७२ मध्ये काँग्रेसचे राज्यमंत्री. १९८७ साली त्यांनी काँग्रेसला रामराम केला.१९८९ ते १९९० या काळात केंद्रीय गृहमंत्रीपदाचा कार्यभार.२००२ साली पहिल्यांदा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.१ मार्च २०१५ रोजी पीडीपी व भाजपाची युती झाल्याने काश्मीरमध्ये सरकार स्थापन करत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ.पारदर्शकतेवर विश्वास ठेवणाऱ्या सरकारमध्ये ते होते, मात्र ते आपल्यात नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे. -ओमर अब्दुल्ला
सईद यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात हळहळ
By admin | Published: January 08, 2016 3:18 AM