शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Saffron Flag on Mosque: कर्नाटकातील मशिदीवर लावला भगवा झेंडा; हिंदू-मुस्लिम बांधवांनी शांततेने हाताळले प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 4:17 PM

Saffron Flag on Mosque: कर्नाटकतील बेलागावी जिल्ह्यातील सत्तीगिरे गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

Saffron Flag on Mosque in Karnataka: मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवरुन अजान देण्याच्या विरोधात महाराष्ट्रातून सुरू झालेले आंदोलन आता कर्नाटकात पोहोचले आहे. येथेही लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, कर्नाटकातील बेलागावी जिल्ह्यात एका मशिदीवर भगवा ध्वज फडकल्याची घटना समोर आली आहे. हा ध्वज उतरवण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या लोकांनी झेंडा पाहिलाकर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सत्तीगिरे गावातील मशिदीत पहाटे भगवा ध्वज फडकताना दिसला. हे गाव बेळगावच्या मुदलगी तालुक्यात असून, सकाळी नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या लोकांनी हा झेंडा पाहिला. परिसरातील वाढता तणाव पाहून मुस्लिम आणि हिंदू दोन्ही बाजूच्या लोकांनी प्रकरण आणखी चिघळण्याआधीच हाताळले. यानंतर भगवा ध्वज उतरवण्यात आला. सध्या परिसरात शांतता असून खबरदारी म्हणून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलीस आरोपींच्या शोधातपोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून ध्वज लावणाऱ्याचा शोध सुरू केला आहे. पोलीस मशिदीच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज स्कॅन करत होते, मात्र अद्याप काहीही सापडले नाही. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

चर्चवरही भगवा ध्वज फडकवण्यात आलायापूर्वी कर्नाटकातील कडबा येथील चर्चवर भगवा ध्वज फडकावल्याचे प्रकरण समोर आले होते. गेल्या आठवड्यात चर्चमध्ये काही काम सुरू होते आणि त्यादरम्यान काही लोकांनी तेथे भगवा ध्वज लावला. मात्र, नंतर पोलिसांनी ध्वज हटवून आरोपीचा शोध सुरू केला. पोलीस सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत.

टॅग्स :Karnatakकर्नाटकMosqueमशिदPoliceपोलिस