UP Ram Navami : उत्तर प्रदेशातील संभल जिल्हा गेल्या काही काळापासून जातीय हिंसाचार आणि मशिदीच्या वादामुळे चर्चेत आहे. याच संभलमध्ये रामनवमीनिमित्त विश्व हिंदू परिषदेतर्फे पहिल्यांदाच भव्य भगवी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक संपूर्ण शहरासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. यामध्ये परंपरा, संस्कृती आणि श्रद्धेचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला.
रामनवमीच्या मिरवणुकीत तरुणींनी हातात तलवारी घेऊन स्टंट केले. धाडस आणि आत्मविश्वासाचे अनोखे उदाहरण त्यांनी यावेळी मांडले. त्याचबरोबर भगवे झेंडे हातात घेऊन तरुणाई मोठ्या उत्साहात नाचताना दिसली. या मिरवणुकीत भगवान राम, हनुमान आणि इतर देवी-देवतांची सुंदर झाकी समाविष्ट होती. संपूर्ण मार्गावर भक्तिसंगीत, जयघोष आणि भाविकांचा उत्साह दिसून येत होता.
कानाकोपऱ्यात सुरक्षामिरवणुकीसाठी शहरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) आणि स्थानिक पोलिस दलाचे कर्मचारी प्रत्येक कोपऱ्यावर तैनात करण्यात आले होते, जेणेकरून मिरवणूक शांततेत आणि सुरक्षितपणे पार पडावी. संभलचा गौरवशाली भूतकाळ आता परतत असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय संघटन मंत्री यावेळी म्हणाले.
अयोध्या राममय झालीदरम्यान, रामनवमीला अयोध्या राममय झाली आहे. आज रामललाचा सूर्य टिळक, अभिजीत मुहूर्तावर दुपारी बाराच्या सुमारास रामललाचा सूर्याभिषेक करण्यात आला. सुमारे 4 मिनिटे सूर्यकिरणे रामललाच्या डोक्यावर पडली. सूर्य टिळकाच्या नंतर रामललाची आरती झाली. सूर्य टिळकाच्या आधी रामललाचे दरवाजे काही काळ बंद होते.
बंगालमध्ये हिंदू संघटनांची मिरवणूक रामनवमीनिमित्त आज पश्चिम बंगालच्या विविध भागांतून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हिंदू संघटना आणि भाजपचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रामनवमीच्या निमित्ताने बंगालमध्ये अनेक दिवसांपासून प्रचंड राजकारण सुरू आहे. यामुळेच राज्यात विविध ठिकाणी कडोकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात होता.