सागरला आता कोणत्याही क्षणी अटक
By admin | Published: October 30, 2015 11:55 PM
जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाळूमाफिया सागर चौधरी याचा अटकपुर्व जामीन अर्ज शुक्रवारी नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.कदम यांनी नांमजूर केला आहे. त्यामुळे सागरला आता कोणत्याही क्षणी अटक होवू शकते. दरम्यान, न्यायालयातून तपासाची कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. शनिवारी ते सीआयडीच्या ताब्यात मिळण्याची शक्यता आहे.
जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाळूमाफिया सागर चौधरी याचा अटकपुर्व जामीन अर्ज शुक्रवारी नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.कदम यांनी नांमजूर केला आहे. त्यामुळे सागरला आता कोणत्याही क्षणी अटक होवू शकते. दरम्यान, न्यायालयातून तपासाची कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. शनिवारी ते सीआयडीच्या ताब्यात मिळण्याची शक्यता आहे.रामानंद नगरचे निलंबित पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी १६ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे आत्महत्या केली होती. आत्महत्येपुर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते व वाळूमाफिया सागर चौधरी यांच्यापासून छळ होत असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार त्यांच्या पत्नी माधुरी सादरे यांच्या फिर्यादीवरुन सुपेकर, रायते व सागर यांच्याविरुध्द नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.का फेटालला अटकपुर्व जामीनवाळू चोरी प्रकरणात महसुल विभागाने केलेल्या कारवाईबाबत सरकारी वकीलांनी पुरावे दलेया पुराव्यामुळे सागर चौधरी वाळूमाफिया असल्याचे उघडवरिष्ठांना हाताशी धरुन सागरने गुन्हे दाखल केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अहवालसागर व वरिष्ठांकडून मानसिक छळ होत असल्याचे सादरेंच्या नातेवाईकांनी दिलेले जबाबवरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे काम करीत नसल्याचा सादरेंचा छळ होत असल्याचा पोलिसांचा अहवालआत्महत्येपुर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत व फिर्यादीत सागरचे नावसागरची पार्श्वभूमी पाहता साक्षीदार व फिर्यादीवर दबावाची शक्यतावरिष्ठ अधिकारी व सागरच्या सहभागातील सत्य शोधण्यासाठी अटकेची आवश्यकताकोट..सागरच्या अटकपुर्व जामीन अर्जावरील सुनावणीसाठी तपासाची कागदपत्रे न्यायालयात सुपूर्द करण्यात आली होती. ही कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली असून ती शनिवारी आम्हाला मिळतील. या कागदपत्रांचा सुक्ष्म अभ्यास करुन त्यादृष्टीने तपास सुरु होईल.-के.डी.पाटील, उपअधीक्षक (सीआयडी)कोट..गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस संशयितांना अटक करु शकतात. या प्रकरणात सागरने अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर सरकार पक्षाने सागर हा वाळू माफिया असल्याचे तसेच वरिष्ठांच्या संगनमताने हा गुन्हा केल्याचा युक्तीवाद करुन पुरावे सादर केल्याने न्यायालयाने त्याचा अर्ज नामंजूर केला. त्यामुळे पोलीस त्याला केव्हाही अटक करु शकतात.-ॲड.राजेंद्र घुमरे, जिल्हा सरकारी वकील