ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ११ - सहारा प्रमुख सुब्रतो राय यांच्या पॅरोलमध्ये ३ ऑगस्टपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी वाढ केली आहे. त्यामुळे त्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सुब्रतो रॉय यांच्या सोबतच कंपनीचे आणखी एक संचालक आरएस दुबे यांचा देखील पॅरोल अर्ज मंजूर करण्यात आला आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात सुब्रतो राय यांनी ३ ऑगस्टपर्यंत सेबीकडे ३०० कोटी जमा केले नाही तर त्यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सुब्रतो राय यांच्या कस्टडी पॅरोलच्या अवधीत सेबीकडे २०० कोटी जमा करण्याच्या अटीवर ११ जुलैपर्यंत वाढ केली होती. मात्र, आता ३ ऑगस्टपर्यंत सेबीकडे ३०० कोटी जमा करण्याच्या अटीवर त्यांच्या पॅरोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत न दिल्याप्रकरणी सुब्रतो रॉय यांना कोर्टाने २०१४ मध्ये जेलमध्ये पाठविले होते.
सहारा प्रमुख सुब्रतो राय यांच्या पॅरोलमध्ये वाढ
By admin | Published: July 11, 2016 7:04 PM