बलवंत तक्षक
चंडीगड : हरयाणात विधानसभा निवडणुकांमध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपने विजय मिळविला. विद्यमान मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांनाच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपविली जाणार आहे. सैनी व अन्य मंत्र्यांचा शपथविधी पंचकुला येथे येत्या गुरुवारी १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहाणार आहेत. सैनी यांच्या नव्या मंत्रिमंडळात दहा मंत्र्यांचा समावेश असेल अशी चर्चा आहे.
शपथविधीचीच्या तयारीसाठी १० सदस्यांची समिती स्थापन केली आहे. शपथविधी आधी १२ ऑक्टोबरला होणार होता. नंतर १५ ऑक्टोबर ठरविलेली तारीख रद्द करून १७ ऑक्टोबरवर शिक्कामोर्तब केले.
या नावांची चर्चामाजी मुख्यमंत्री बन्सीलाल यांची नात श्रुती चौधरी, अनिल विज, कृष्ण लाल पंवार, मूलचंद शर्मा, महिपाल ढांडा, विपुल गोयल, रणबीर गंगवा, राव नरबीर सिंह, आरती राव, कृष्ण बेदी, हरविंदर कल्याण, डॉ. कृष्ण लाल मिड्ढा, कृष्णा गहलावत और राजेश नागर यांची नावे शर्यतीत आहेत.