शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा जोड व चौकटी

By admin | Published: July 10, 2015 11:13 PM

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्याचे सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावर आगमन होणार असल्याने दुपारपासून शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर दुर्तफा गर्दी केली होती. फर्ग्युसन रस्त्यावर सुरेख रांगोळया काढण्यात आल्या होत्या. ज्ञानेश्वर पादुका चौकातील मंदिरामध्ये स्पिकरवर अभंगवाणी लावण्यात आल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. युवक -युवती, लहान मुले, महिला, ज्येष्ठ ...


संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्याचे सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावर आगमन होणार असल्याने दुपारपासून शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर दुर्तफा गर्दी केली होती. फर्ग्युसन रस्त्यावर सुरेख रांगोळया काढण्यात आल्या होत्या. ज्ञानेश्वर पादुका चौकातील मंदिरामध्ये स्पिकरवर अभंगवाणी लावण्यात आल्याने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. युवक -युवती, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठया आतुरतेने पालखीची वाट पाहत होते. सायंकाळी सात वाजता संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे फर्ग्युसन रस्त्यावर आगमन झाले. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. पादुकांना स्पर्श करून दर्शन घेतल्यानंतर कृतकृत्य झाल्याची भावना भाविकांच्या चेहर्‍यावर दिसून येत होती.
संत तुकाराम महाराजांची पालखी फर्ग्युसन रस्त्यावर आल्यानंतर वरूणराजाने हलक्या सरींचा वर्षाव करीत पालखीचे स्वागत केले. संत तुकाराम पादुका मंदिराजवळ पालखी आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे मोठया उत्साहात सायंकाळी सव्वा सात वाजता आरती करण्यात आली. हरीनामाचा जयघोष करीत पालखी पुढे सरकत होती. वारकर्‍यांना राजगिर्‍याचे लाडू, बिस्किट, पाणी यांचे वाटप केले जात होते. अभंग म्हणत, विठठ्लाचे गुणगाण करीत पालखी पुढे सरकत होती.

चौकट
अन् अश्रूंचा बांध फुटला
सासू आणि सुन या दोघी मिळून पालखीच्या दर्शनासाठी आलेल्या होत्या. संत तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर अचानक मोठी गर्दी झाली, या गर्दीत रानडे इन्टिटयूटजवळ थांबलेल्या सासू व सुना यांची तुटातुट झाली. दोघींनीही एकमेंकींची शोधाशोध सुरू केली. सासूचा मोबाइल सुनेच्याच पर्समध्ये असल्याने आणखीनच अडचण निर्माण झाली. सासू सापडत नसल्याने सुनबाई खूपच घाबरून गेल्या होत्या. डोळयात पाणी आणून त्या सासूचा शोध घेत होत्या. अखेर काही वेळाने सासूबाई त्यांना भेटल्या, त्यावेळी सूनेने खूप वेळापासून रोखून धरलेला अश्रूंचा बांध फुटला. दोघींनी एकमेंकींना गच्च मिठी मारली.
................

चौकट
वाटपाच्या साहित्याची फेकाफेकी
पालखी सोहळयात सहभागी झालेल्या वारकर्‍यांना वाटण्यासाठी अनेकांनी राजगिर्‍याचे लाडू, बिस्किट, पाण्याच्या बॉटल आणल्या होत्या. पालखी आल्यानंतर मोठी गर्दी झाल्याने या साहित्याचे वाटप करण्यासाठी वारकर्‍यांपर्यंत पोहचता येईना. त्यावेळी राजगिर्‍याचे लाडू, बिस्किटचे पुडे दिंडीतील वारकर्‍यांच्या अंगावर फेकले जाऊ लागले. वारकर्‍यांना ते जोरात लागत होते, हा चुकीचा प्रकार यावेळी दिसून आला.
..............