अयोध्या : अभिनेत्री कंगना रनौत व शिवसेना यांच्यातील वादात कंगनाला पाठिंबा देत येथील संतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विरोध सुरू केला. संत व विश्व हिंदू परिषदने ठाकरे यांनी अयोध्येत येऊ नये, अशी घोषणा करीत ते आल्यास त्यांना तोंड द्यावे लागेल, असे म्हटले.
अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढत चालला असून, कंगनाला पाठिंबा देत येथील संतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच विरोध सुरू केला आहे. संत आणि विश्व हिंदू परिषदने ठाकरे यांनी अयोध्येत येऊ नये, अशी घोषणा केली व ते आल्यास त्यांचे स्वागत तर होणार नाहीच; पण विरोधाला त्यांना तोंड द्यावे लागेल, असे म्हटले.
वस्त्रहरणाची भित्तीपत्रके
वाराणसी : अभिनेत्री कंगना रानौत हिला द्रौपदीच्या रूपात दाखवलेली भित्तीपत्रके येथे गुरुवारी बघायला मिळाली. या भित्तीपत्रकांत द्रौपदीचे वस्त्रहरण (चिरहरण) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करताना, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान कृष्णाच्या रूपात दाखवून तिचे संरक्षण करताना दिसतात.
‘आशा रानौत यांचे भाजपमध्ये स्वागत करू’सिमला : अभिनेत्री कंगना रानौत यांची आई आशा रानौत यांनी जर भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे हिमाचल प्रदेश भाजपचे अध्यक्ष सुरेश काश्यप यांनी म्हटले.