वणी - नैसर्गीक वनसंपदा अबाधित राहुन संरक्षण व जतन व्हावे या उद्देशाने भातोडे येथील ग्रामस्थांच्या सकारात्मक भूमिकेची दखल प्रशासक्र ीय पातळीवर घेण्यात आली असुन प्रांत अधिकारी मुकेश भोगे यांनी गौण उत्पन्नासाठी 50 हेक्टर क्षेत्र मंजुर केल्याने त्या माध्यमातुन मिळणार्या उत्पन्नाचा वापर ग्रामविकासासाठी करता येणार आहे दिडोरी तालुक्यातील भातोडे येथील ग्रामस्थांनी वन व्यवस्थापन समतिीच्या सहकार्याने सुमारे 500 हेक्टर क्षेत्रापैकी दोनशे हेक्टर क्षेत्रामधे वीस हजार वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता दहा हजारापेक्षा अधिक खडड्यांचे खोदकाम वृक्ष लागवडीसाठी अजामतिीस करण्यात आले आहे या उपक्र माची दखल प्रांत अधिकारी मुकेश भोगे यांनी घेत आज मंगळवारी भातोडे गावास भेट देऊन उपक्र माची माहिती घेतली तसेच मार्गदर्शन केले गौण उत्पन्नासठी 50 हेक्टर क्षेत्र मंजुरी पत्र ग्रामसेविका पवार यांना दिले बांबु गवत डिक फळझाडे व भाजीपाला यांची लागवड करून उत्पादित वस्तुंच्या विक्र ीच्या माध्यमातुन ग्रामविकासासाठी आर्थिक स्त्रोत उभारण्याचा यापाठीमागे उद्देश असुन स्वयंपूर्ण व स्वावलंबी द्दष्टिकोण ठेवुन ग्रामस्थानी यात सहभागी होण्याचे आव्हाण भोगे यांनी यावेळी केले ग्रामस्थांतर्फे ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन भोगे यांना सन्मानित करण्यात आले यावेळी परिसरातील ग्रामस्थ उपस्थीत होते दरम्यान गटविकास अधिकारी राहुल रोकडे यांनीही भेट देऊन उपक्र मास अनुकुलता दर्शविली यावेळी किरण महाले रंगनाथ चव्हाण, काशीनाथ ठाकरे पंडित पालवी सोनीबाई महाले दशरथ महाले सुनिल जोपळे विश्वनाथ खांडवी आनंदा राऊत आदि उपस्थीत होते (वार्ताहर )क्कड्ड1द्बठ्ठ ष्ठशद्धद्ब
गौण उत्पन्नासाठी 50 हेक्टर क्षेत्र मंजुर ,भातोडे येथील ग्रामस्थांच्या सकारात्मक भूमिकेची दखल
By admin | Published: June 22, 2016 10:04 PM