शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

आक्रमक भाषणशैली, सुळेंशी जवळीकीचं बक्षीस; सक्षणा सलगर यांना पवारांच्या राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 17:35 IST

सक्षणा सलगर या आपल्या आक्रमक भाषणांसाठी ओळखल्या जातात. निवडणूक काळात त्यांनी सत्ताधारी महायुतीविरोधात मोठं रान उठवलं होतं. 

NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून महिला पदाधिकारी सक्षणा सलगर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सलगर यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत झालेल्या मतभेदांनंतर सोनिया दुहान यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर पक्षाच्या महिला आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त होते. अखेर या पदावर आता सक्षणा सलगर यांची निवड करण्यात आली आहे.

धाराशिव जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून राजकारणात आलेल्या सक्षणा सलगर या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय आहेत. जाहीर सभांतून केल्या जाणाऱ्या आक्रमक भाषणांसाठी त्या ओळखल्या जातात. निवडणूक काळात त्यांनी सत्ताधारी महायुतीविरोधात मोठं रान उठवलं होतं. 

सक्षणा सलगर यांचा राजकीय प्रवास

वयाच्या २१ व्या वर्षी सक्षणा सलगर २०१२ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. नंतर २०१७ च्या निवडणुकीत त्यांना पुन्हा एकदा जिल्हा परिषदेची संधी मिळाली. २०१८ मध्ये तत्कालीन एकसंध असलेल्या राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला मोठी गळती लागल्यानंतर तत्कालीन युती सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत सलगर यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र झंजावाती प्रचार केला. मागील निवडणुकीतील झंजावाती प्रचारामुळेच सक्षणा सलगर यांचे नेतृत्व राज्यभर पोहोचले. 

दरम्यान, जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. त्यावेळी सक्षणा सलगर यांनी शरद पवार यांच्या सोबत निष्ठा कायम ठेवली. राष्ट्रवादीतील फुटीपूर्वी शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर पवारांच्या निवृत्तीला विरोध करणाऱ्यांमध्ये  सलगर याचं नाव आघाडीवर होतं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सलगर या तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक होत्या. मात्र संधी मिळाली नाही. त्यानंतरही त्या पक्षसंघटनेत कार्यरत राहिल्या. याचंच फळ म्हणून त्यांना आता पक्षाच्या राष्ट्रीय युवती अध्यक्षपदी संधी मिळाली आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळे