हैदराबाद : नित्यनेमाने काम करत पगार घेतला तर तो महिन्याला १ लाख रुपये बँकेत जमा होणार. मात्र सरकारी नोकरी करताना भ्रष्टाचाराची हवा लागलेल्या एका अधिका-याने चक्क 500 कोटींची माया जमविली. आपल्या नातेवाईकांच्या नावे अनेक कोटींची संपत्ती, त्यांच्याच घरात सोने-चांदी आणि हि-याचे दागिने लपवणा-या या अधिका-याचा मात्र निवृत्तीच्या केवळ तीन दिवस आधी भांडाफोड झाला.
तीन दिवस निवृत्तीला शिल्लक असताना एका अधिका-याकडे तब्बल ५०० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याची धक्कादायक माहिती भ्रष्टाचारविरोधी पथकाने समोर आणली असून, एक लाख पगार असलेल्या या अधिका-याला त्यांनी ताब्यात घेतले आहे.
विशाखापट्टनम पालिकेतील नगर विकास विभागात कार्यरत असणा-या गोल्ला वेंकटा रघुरामी रेड्डी या अधिका-याच्या घरी आणि त्याच्या विविध कार्यालयांवर भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या पथकाने धाडी घातल्या. त्यात त्यांच्या हाती डोळे विस्फारणारी मालमत्ता हाती आहे. त्याच्या विशाखापट्टनम, विजयवाडा, तिरूपती येथेही मालमत्ता असून, शिर्डीतही त्याचे हॉटेल आहे. एसीबीने शिर्डीसह एकूण १५ ठिकाणीही धाडी टाकल्या असून, तेथील संपत्तीची मोजपाम अद्याप सुरू आहे.
त्याच्या संपत्तीचे सोमवारी मध्यरात्रीपासून ते मंगळवारी रात्रीपर्यंत मोजणी सुरू होती. अद्याप त्याने बँक लॉकरमध्ये किती दागिने-जडजवाहिरे ठेवली याची माहिती मिळू शकलेली नाही. एसीबीच्या अधिका-यांनी रेड्डीचा भाऊ आणि विजयवाडाच्या शहर नियोजन खात्यातील अधिकारी वेंकट शिवप्रसादच्या घरीही धाड टाकली. हा अधिकारी रेड्डीच्या ‘बेनामी’ प्रॉपर्टीसाठी मालक म्हणून लावत होता.
निवृत्तीनिमित्त परदेशात शाही पार्टीचे आयोजनबुधवारी गोल्ला रेड्डी निवृत्त होणार होते. निवृत्तीनिमित्त ते परदेशात शाही पार्टीचेही आयोजन करणात होते. त्यासाठी आपल्या आप्तांच्या विमान प्रवासाचे तिकीट बूक करून ठेवले होते.किती आहे ही संपत्ती- सोने, चांदी, हि-यांचे १० किलो वजनाचे दागिने- सोन्याचे ४ कोटी रुपयांचे दागिने, ५ लाखांचे चांदीचे दागिने, ४३ लाख रुपये रोख- चांदीचे दागिने आणि वस्तू : २५ किलो- मालमत्ता : विजयवाडा जवळ ९३,०१५ स्क्वेअर फूट जागा, तसेच वेलपूर येथे दोन एकर जमीन- गोल्लाची संपत्ती त्याचा नातेवाईक शिवप्रसाद व त्याची बायका गायत्रीच्या नावेही होती.- कृष्णा जिल्ह्यात ११ एकर जागेवर अंब्याची बाग- विजयवाडामध्ये तीन मजली आणि दोन मजली घरे- गुंटूर येथे साडेपाच एकर जमीन- चार कंपन्या : साई साधना इन्फ्रा प्रोजेक्ट्स, साई श्रद्धा अव्हेन्यूज, माता इंटरप्रायजेस, नल्लूरिवारी चॅरिटेबल ट्रस्ट.वॉशिंग मशिनमध्ये १९ कोटींचे दागिनेरेड्डीचा नातेवाईक असलेल्या शिवप्रवासच्या घरी टाकलेल्या धाडीत एका वॉशिंगमशिनमध्ये तब्बल १९ कोटी रुपये किंमतीचे सोने आणि हिºयाचे दागिने सापडले आहेत. दागिन्यांचा साठा बघून पोलीसही चक्रावून गेले होते.