नवी दिल्ली : तामिळनाडूतील एका तरुणाने आघाडीच्या आयटी कंपनीतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून शेती करण्यासाठी चक्क जपानची वाट धरली. आता तो नोकरीतील कमाईपेक्षा दुप्पट पैसे कमावू लागला आहे. वेंकटस्वामी विग्नेश (२७) असे त्याचे नाव आहे.
विग्नेशने सांगितले की, लॉकडाऊन काळात त्याचा शेतीमधील रस वाढला. याच काळात चेन्नईत जपानी भाषा व संस्कृती शिकवणाऱ्या एका संस्थेशी त्याचा संपर्क आला. विग्नेशने तेथे वांग्याच्या शेतीचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्याने जपानमध्ये शेतकरी म्हणून नवीन नोकरी स्वीकारली. त्याचा राहण्याचा खर्चही कंपनीच उचलते.
जॅक मा वळले शेतीकडे‘अलिबाबा’चे संस्थापक चिनी उद्योगपती जॅक मा यांनी जपानमध्ये तीन महिने घालवले. या काळात त्यांनी शेती आणि मत्स्यपालन यासंबंधीचे प्रशिक्षण घेतल्याचे नंतर समोर आले. त्यानंतर ते शेतीकडे वळणार असल्याचा अंदाज आहे.