नवी दिल्ली : सरकारने निश्चित खुराकचे मिश्रण असणाऱ्या औषधींवर बंदी घातल्यानंतर ‘प्रॉडक्ट अॅण्ड गॅम्बल’ने (पी अॅण्ड जी) आपल्या लोकप्रिय ब्रॅण्ड ‘विक्स अॅक्शन ५00 एक्स्ट्रा’च्या उत्पादनावर आणि विक्रीवर त्वरित बंदी घातली आहे.कंपनीने शेअर बाजाराला ही माहिती दिली. कंपनीने म्हटले आहे की, भारत सरकारने पॅरासिटामोल, फेनिलाफ्राईन आणि कॉफिन यांचे निश्चित खुराकांचे मिश्रण असणाऱ्या औषधींवर बंदी घातली आहे.‘विक्स अॅक्शन ५00 एक्स्ट्रा’ हे आमचे उत्पादन केंद्र सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत येते. त्यामुळे आम्ही ‘विक्स अॅक्शन ५00 एक्स्ट्रा’चे उत्पादन आणि विक्री त्वरित बंद केली आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर फायजर आणि अबॉट या प्रमुख औषधी उत्पादक कंपन्यांनी बोरेक्स व फेन्सेडिल या खोकल्यावरील औषधींचे उत्पादन व विक्री सोमवारी बंद केली होती. या बंदीचा परिणाम टाळण्यासाठी पर्यायी औषधी आपण शोधत आहोत, असे या दोन्ही कंपन्यांतर्फे सांगण्यात आले होते. त्या पाठोपाठ मंगळवारी ‘प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल’ या कंपनीने ‘विक्स अॅक्शन ५00 एक्स्ट्रा’ची विक्री बंद करण्याची घोषणा केली आहे.प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बलने म्हटले की, ग्राहकांच्या आरोग्यास आम्ही सर्वोच्च प्राधान्य देत आहोत. नियामकांनी आम्हाला ६0 औषधींच्या उत्पादनाची आणि विक्रीची परवानगी दिली आहे.
‘विक्स अॅक्शन ५00 एक्स्ट्रा’ची विक्री बंद
By admin | Published: March 16, 2016 8:38 AM