साळगावकर बंधूंची तीन तास चौकशी
By admin | Published: August 31, 2015 9:44 PM
खाण घोटाळा : शशीकुमार यांची आज चौकशी शक्यपणजी : खनिज घोटाळा प्रकरणात उद्योजक समीर साळगावकर आणि अर्जुन साळगावकर या बंधूंची सोमवारी विशेष पोलीस पथकाने तीन तास चौकशी केली. खाण घोटाळ्यात अडकलेल्या मेसर्स कांतिलाल अँड कंपनीचे हे दोघे बंधू संचालक आहेत. दरम्यान, याच घोटाळ्यात वन खात्याचे माजी प्रधान वनपाल शशीकुमार यांना ...
खाण घोटाळा : शशीकुमार यांची आज चौकशी शक्यपणजी : खनिज घोटाळा प्रकरणात उद्योजक समीर साळगावकर आणि अर्जुन साळगावकर या बंधूंची सोमवारी विशेष पोलीस पथकाने तीन तास चौकशी केली. खाण घोटाळ्यात अडकलेल्या मेसर्स कांतिलाल अँड कंपनीचे हे दोघे बंधू संचालक आहेत. दरम्यान, याच घोटाळ्यात वन खात्याचे माजी प्रधान वनपाल शशीकुमार यांना आज, मंगळवारी एसआयटीसमोर उपस्थित राहण्यास समन्स बजावलेले होते. त्यानुसार ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सांगे येथील अश्नी डोंगर खाण प्रकरणात नोंदविलेल्या एफआयआरसंबंधी एसआयटीचा तपास जोरात सुरू आहे. समीर व अर्जुन यांना 26 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी एसआयटीकडून समन्स बजावले होते; परंतु त्यांनी त्यासाठी असर्मथता व्यक्त केली होती. तसेच 31 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे वकिलांतर्फे कळविले होते. त्यानुसार सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते एसआयटीत आले. निरीक्षक राहुल परब आणि नारायण चिमुलकर यांनी त्यांची चौकशी केली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते एसआयटीतून बाहेर पडले. तूर्त त्यांना जाऊ दिले असले तरी गरज पडल्यास पुन्हा बोलावले जाईल, असे एसआयटीच्या सूत्रांनी सांगितले. अश्नी डोंगरावर बेकायदा खनिज उत्खनन करण्याचा ठपका न्यायमूर्ती एम. बी. शहा आयोगाच्या अहवालात मेसर्स कांतिलाल कंपनीवर ठेवला होता. र्मयादा ओलांडून उत्खनन, संबंधित खात्यांच्या परवान्याशिवाय उत्खनन, सरकारी महसूल बुडविणे, अशा प्रकारचे ठपके अहवालात आहेत. या प्रकरणात खाण खात्याकडून अनिल साळगावकर, माजी मंत्री ज्योकिम आलेमाव यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविला होता. ज्योकिम आलेमाव या प्रकरणात कंत्राटदार होते. (प्रतिनिधी)दोघांनाही दोन खोलीतसमीर व अर्जुन या दोघांची दोन खोल्यांत, दोन वेगळ्या अधिकार्यांकडून चौकशी झाली. त्यामुळे दोघांची जरा अडचण झाली. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना दोघांतही एकवाक्यता आहे की नाही हे पाहण्यासाठी पोलिसांकडून अनेकवेळा ही युक्ती लढविली जाते.गुरुवारी सुनावणीया बंधूंनी अटकपूर्व जामिनासाठी पणजी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयाने एसआयटीला या प्रकरणात नोटीस पाठविली आहे. सोमवारी चौकशीसाठी आले असता एसआयटीकडून अटक होण्याची शक्यता वाटल्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात सोमवारी सुनावणीवेळी एसआयटीचे वकील गुरुप्रसाद कीर्तनी यांनी म्हणणे सादर करायला वेळ मागितला. आता या प्रकरणावर गुरुवारी, 3 सप्टेंबर रोजी सुनावणी आहे. हेदेंच्या अर्जावर 10 रोजी सुनावणीखाण घोटाळ्यातील प्रफुल्ल हेदे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरही सुनावणी पुढे ढकलली. ही सुनावणी गुरुवारी, 10 सप्टेंबरला आहे.