ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २९ - जागतिक अर्थव्यवस्था संकटात आहे, वित्तीय बाजारपेठेत घसरण सुरु आहे मात्र या परिस्थितीतही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे असे सांगत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी २०१६ अर्थसंकल्पाच्या भाषणाची सुरुवात केली.
महागाई आणि मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा वारसा आम्हाला मिळाला होता. तरीही मागच्या तीन वर्षांच्या तुलनेत आमच्या सरकारने चांगली कामगिरी केली असे जेटली यांनी सांगितले.
अर्थसंकल्पाची वैशिष्टये
सेक्शन ८८ जी अंतर्गत घरभाडे भत्ता यात मिळणारी करवजावट 24 हजार रुपयांवरुन 60 हजार रुपये करण्यात आली.
वित्तीय तूट 2015-16 मध्ये 3.9 टक्के होती, 2016-17 मध्ये 3.5 टक्के राहील असा अंदाज आहे.
कर्मचारी भविष्य निधी अंतर्गत नव्याने येणा-या कर्मचा-यांसाठी पहिली तीन वर्ष सरकारचे योगदान 8.33 टक्के राहील.
पहिलंच घर घेणा-यांसाठी 37 लाख रुपयांपर्यत गृहकर्ज व घराची किंमत 50 लाखांपर्यंत असल्यास 50 हजार रुपयांची कर सवलत
5 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांना दोन हजारांऐवजी 5 हजारांची कर सवलत.
प्राप्तीकर मर्यादेत कोणताही बदल नाही, करसवलतीची मर्यादा 2.5 लाखांवरच
लक्झरी कार, ब्रँडेड कपडे महागणार, बिडी सोडून इतर तंबाखूजन्य पदार्थ , सिगरेटही होणार महाग,
पायाभूत सुविधांच्या विकासासाठी २०१७ मध्ये २.२१ लाख कोटी खर्चाची तरतूद.
रस्ते बांधणीसाठी १५ हजार कोटी कर्जाच्या माध्यमातून उभारणार, बंदर विकासासाठी ८०० कोटींची तरतूद.
कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, जेटलींनी कार महाग केली आहे . १० लाखापेक्षा जास्त किंमतीच्या गाडयांवर एक टक्का अतिरिक्त कर, लहान पेट्रोल गाडयांवर १ टक्के सेस, डिझेल गाडयांवर २.५ टक्के सेस.