जोधपूर - 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला आज 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र उच्चनायालयातील अपीलासाठी शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करुन सलमान संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत तुरुंगाबाहेर येईल. रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान तो बांद्रयातील आपल्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचू शकतो.
सलमानच्या जामिनाला सरकारी वकिलांनी तीव्र विरोध केला होता. सलमानला आतापर्यंत जेव्हा जेव्हा जामिन मिळाला त्यावेळी त्याने कधीही जामिनाच्या अटींचे उल्लंघन केलेले नाही त्यामुळे त्याला जामीन मंजूर करावा अशी विनंती त्याच्या वकिलांनी केली होती. अखेर न्यायाधीशांनी बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करुन सलमानला जामीन मंजूर केला.
सलमानची सुटका होणार हे स्पष्ट होताच जोधपूर कोर्ट परिसर आणि मुंबईतील त्याच्या घराबाहेर एकच जल्लोष सुरु झाला. देशाच्या वेगवेगळया भागातून आलेले चाहते सलमानच्या घराबाहेर जमले आहेत.
ठळक घडामोडी
- तुरुंगातून सुटल्यानंतर सलमान खान मुंबईत दाखल
- सलमान खानला जामीन मंजूर करताना, कोर्टाने दोन अटी घातल्या आहेत. सलमानला 7 मे रोजी कोर्टात यावं लागेल, तसेच देश सोडण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल.
- सात मे रोजी सलमान खानला हजेरीचे आदेश
- सलमान खानला जामीन मंजूर
- सलमान खानच्या जामीन अर्जावर दुपारी तीन वाजता निर्णय
- सलमानची बहिन अलविरा कोर्टात दाखल
- जोधपूर सत्र न्यायालयात जामिनावर सुनावणी पुर्ण, थोड्यात वेळात निर्णय
- थोड्याच वेळात सलमान खानच्या जामिनावर निर्णय
- दुपारी 2 वाजेपर्यंत सलमानच्या जामिनावर निर्णयाची शक्यता
- सरकारी वकिल आणि सलमान खानच्या वकिलामध्ये कोर्ट रुममध्ये घमासान युक्तीवाद सुरु
- दुपारच्या जेवनानंतर सलमान खानला जामिनावर निर्णयाची शक्यता
- खटल्याशी संबधित कागदपत्रे सादर
- सलमान खानच्या जामिनाला सरकारी वकिलाचा विरोध
- न्यायाधीश रविंद्र कुमार जोशींसमोर दोन्ही पक्षाचा युक्तीवादाला सुरुवात
- रविंद्र कुमार जोशीच करणार सलमानच्या खटल्याची सुनावणी
- जामिनावर आज निर्णय येईल - सलमान खानचे वकिल
- सलमान खानचा बॉडीगॉर्ड शेरा कोर्ट रुममध्ये दाखल
- सलमान खानची बहिन अलविरा खान कोर्टात दाखल
- सत्र न्यायालयाचे न्यायाधीश रविंद्र कुमार जोशी जोधपुर न्यायालयात पोहोचले, सलमान खानच्या जामीन अर्जावर होणार सुनावणी.
- सलमानच्या जामिनावर आज सुनावणी होण्याची शक्यता, न्यायाधिश रविंद्रकुमार जोशी कोर्टाकडे रवाना