जोधपूर : 1998च्या काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले आहे. याप्रकरणी त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि 10 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, त्याची रवानगी जोधपूरच्या तुरुंगात करण्यात आली आहे. दरम्यान, सलमान खानला तुरुंगातील कैदी नंबर 106 देण्यात आला असून बराक क्र. 2 मध्ये ठेवण्यात येणार आहे. जोधपूर तुरुंगाचे डीआयजी विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानला जेलमध्ये कैदी नंबर 106 देण्यात आला आहे. त्याला तुरुंगातील ड्रेस उद्या देण्यात येणार आहे. तसेच, सलमान खाने तुरुंगातले जेवण नाकारले आहे. त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे, असेही ते म्हणाले. याचबरोबर, सलमान खाने अजून ड्रेस बदललेला नाही. तो अजून आज घातलेल्याच कपड्यांवर आहे. सध्या त्याने कोणतीही मागणी केलेली नाही. त्याला विशेष सुरक्षेत ठेवण्यात आले आहे, असे विक्रम सिंह यांनी सांगितले.
सलमान खान कैदी नंबर 106, तुरुंगातील जेवण नाकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 8:52 PM
सलमान खानला तुरुंगातील कैदी नंबर 106 देण्यात आला असून बराक क्र. 2 मध्ये ठेवण्यात येणार आहे.
ठळक मुद्देसलमान खानला तुरुंगातील कैदी नंबर 106 देण्यात आला असून बराक क्र. 2 मध्ये ठेवण्यात येणार आहे.