Twitter: सलमान खान, राहुल गांधींची ‘ब्लू टिक’सुद्धा ट्विटरने काढली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 06:23 AM2023-04-22T06:23:50+5:302023-04-22T06:24:45+5:30

Twitter: ट्विटरने २० तारखेच्या मध्यरात्री सत्यता पडताळणी झालेल्या खात्यांमधून (व्हेरिफाइड अकाउंट्स) ब्लू टिक्स काढून टाकले आहेत. अर्थात, त्यासाठी पैसे न भरलेल्या खात्यांनाच हा फटका बसला आहे.

Salman Khan, Rahul Gandhi's 'blue tick' was also removed by Twitter | Twitter: सलमान खान, राहुल गांधींची ‘ब्लू टिक’सुद्धा ट्विटरने काढली

Twitter: सलमान खान, राहुल गांधींची ‘ब्लू टिक’सुद्धा ट्विटरने काढली

googlenewsNext

नवी दिल्ली : ट्विटरने २० तारखेच्या मध्यरात्री सत्यता पडताळणी झालेल्या खात्यांमधून (व्हेरिफाइड अकाउंट्स) ब्लू टिक्स काढून टाकले आहेत. अर्थात, त्यासाठी पैसे न भरलेल्या खात्यांनाच हा फटका बसला आहे. यामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी,  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांसारख्या अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.
  अमिताभ बच्चन यांना पैसे भरूनही ब्लू टिक न मिळाल्याने आता काय पाया पडू का, असे ट्विटरला विचारले. इलॉन मस्क यांनी १२ एप्रिल रोजीच यासंदर्भात घोषणा केली होती. ब्लू टिक यापूर्वी राजकारणी, सेलिब्रिटीच्या खात्यांसाठी राखीव होती.

क्रिकेपटूंनाही दे धक्का
ट्विटरने यांचेही ब्लू टिक हटवले: रोहित शर्मा, विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीसह अनेक बड्या क्रिकेटपटूंच्या ट्विटर अकाउंटवरून ब्लू टिक्स काढल्या आहेत. ओलंपिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, नीरज चोप्रा, मल्ल बजरंग पूनिया, विश्व चॅम्पियन मुष्टियोद्धा निखत झरीन, सानिया मिर्झा, फुटबॉल कर्णधार सुनील छेत्री, हॉकी गोलकीपर पीआर श्रीजेश , टेनिस दिग्गज रॉजर फेडरर, राफेल नदाल, फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो, किलियन एम्बाप्पे, बास्केटबॉलपटू स्टीफन करी.

महिन्याला ९०० रु. ‘ब्लू सबस्क्रीप्शन’साठी दरमहा ९०० रुपये द्यावे लागतील. तर वेब वापरकर्त्यांना ६५० रुपयांत सबस्क्रीप्शन मिळेल.

Web Title: Salman Khan, Rahul Gandhi's 'blue tick' was also removed by Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.