ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि.20- उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वडिल शहीद झाल्याची बातमी कळल्यानंतरही जवानांच्या मुलींनी शाळेची परिक्षा चुकवली नाही. उरी हल्ल्यात बिहारच्या गयामधील सुनील कुमार विद्यार्थी शहीद झाले. त्यांना तीन मुली आहेत. 14 वर्षांची आरती, 12 वर्षांची अंशू आणि 7 वर्षांची अंशिका.
सुनील कुमार हे शहीद झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण बिहारमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या तिन्ही मुलींनी वडीलांच्या निधनाची बातमी कळूनही मोठ्या हिंमतीने शाळेत जाऊन परीक्षा दिली.संपूर्ण कुटुंब दुःखात बुडालं असताना त्यांनी मोठ्या धैर्याने परीक्षा दिली. सुनील कुमार यांच्या मुलीच्या परिक्षा देण्याच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यांच्याशी जेव्हा शेवटचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी परीक्षेबाबत विचारलं आणि चांगला अभ्यास करण्याची सुचना वडिलांनी केली होती. ते आम्हाला मुलाप्रमाणेच वागवायचे . ते तर देशासाठी शहीद झाले. तुम्ही देखील देशासाठी काहीतरी करा असं ते आम्हाला नेहमी सांगायचे. म्हणूनच आम्ही परीक्षा द्यायला गेलो. असं त्यांच्या मुलींनी सांगितलं. मुलींची ही हिंम्मत पाहून मुख्याध्यापकांसह सर्वच शिक्षकांनी या तिन्ही मुलींच्या धैर्याला सलाम केला.