पश्चिम बंगालमध्ये एका १२ वर्षाच्या मुलाच्या दक्षतेमुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला आहे. पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा ट्रक खराब झाला होता आणि ट्रेन वेगात पुढे जात होती, तिथे असणाऱ्या एका मुलाने ट्रक खराब असल्याचे पाहिले आणि आपला लाल शर्ट काढला आणि फिरवू लगाला. समोर दिसलेलं लाल कपड पाहून लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावला, त्यामुळे मोठा अपघात टळला. आता या मुलाला रेल्वेकडून बक्षीसही देण्यात आले आहे.
रोजगार मेळाव्यात ५१,००० नियुक्ती पत्रांचे वाटप; PM मोदी म्हणाले, "नवा भारत कमाल करत आहे..."
या संदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील एका १२ वर्षाच्या मुलाने खराब झालेले रेल्वे ट्रॅक पाहून पॅसेंजर ट्रेनसमोर लाल शर्ट फिरवून मोठा अपघात होण्यापासून वाचवला आहे. या मुलाचे नाव मुर्सलीन शेख आहे, लोको पायलटने त्याचा सिग्नल पाहिला आणि योग्य वेळी ट्रेन थांबवण्यासाठी आपत्कालीन ब्रेक लावले. ही घटना गुरुवारी भालुका रोड यार्डजवळ घडली.
ईशान्य सीमा रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सब्यसाची डे म्हणाले, "एका १२ वर्षांच्या मुलाने मालदा ट्रेन थांबवण्यासाठी त्याने लाल शर्ट फिरवला, त्यामुळे लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावला आणि पॅसेंजर ट्रेन थांबवली. मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅक खराब झाल्यामुळे मुलाने हे केले.
पावसामुळे माती आणि खडे वाहून गेले होते. त्या ठिकाणी पोरीयनचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकारी म्हणाले, "नजीकच्या गावातील एका स्थलांतरित कामगाराचा मुलगा मुरसलीन शेख हा देखील रेल्वे कर्मचाऱ्यांसह यार्डात उपस्थित होता. पावसामुळे रुळाखालील भाग खराब झालेले पाहून त्या मुलाने समजूतदारपणा आणि सावधगीरी दाखवली. येणार्या पॅसेंजर ट्रेनच्या समोर त्याला लाल शर्ट फिरवला यामुळे लोको पायलटने ट्रेन थांबवली.
खराब झालेल्या ट्रॅकचा भाग दुरुस्त करण्यात आला आणि नंतर ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यात आले. रेल्वे अधिकाऱ्यांनी या धाडसी मुलाला त्याच्या शौर्याबद्दल प्रमाणपत्र आणि रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले. मालदा उत्तरचे खासदार खगेन मुर्मू यांच्यासह कटिहार विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुरेंद्र कुमार यांनी मुलाच्या घरी पोहोचून त्याला बक्षीस दिले आणि त्याचे कौतुक केले.