'आज काय बनवलंय?' असा प्रत्येक घरातील गृहिणीला सहज विचारला जाणारा प्रश्न. काळ बदलला पण हा प्रश्न अजूनही तसाच आहे. जेमिनी कुकिंग ऑईल हे सरकार मान्यताप्राप्त देशातील नंबर १ गुणवत्तेचे तेल म्हणून ओळखले जाते. जेमिनीने एका लघुपटाच्या माध्यमातून एक भावुक गोष्ट सगळ्यांसमोर मांडली आहे, ज्याने प्रत्येकाचेच डोळे उघडतील. ही गोष्ट आहे मीनाक्षी वाळके या यशस्वी उद्योजिकेची. मीनाक्षी वाळके यांना 'बांबू लेडी ऑफ इंडिया' म्हणून ओळखलं जातं. या लघुपटाच्या माध्यमातून जेमिनीने गृहिणींना पाठिंबा देणारी मोहीम सुरू केली आहे. 'आज काय बनवलंय' या प्रश्नावरून 'आज काय बनायचंय' या प्रश्नाकडे लोकांनी वळावं अशी प्रेरणा देणारी ही मोहीम आहे. गृहिणींच्या टॅलेंटला खरोखरच सलाम. त्यांना त्यांचं पॅशन आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वेळ देणं, तितकं सक्षम बनवणं गरजेचं आहे. हाच या मोहिमेचा उद्देश आहे.
मीनाक्षी वाळके यांनी आयुष्यात केलेला स्ट्रगल दाखवणारा हा लघुपट आहे. एक सामान्य गृहिणी ते बांबू आर्ट वर्क क्षेत्रातील यशस्वी उद्योजिका असा त्यांचा प्रवास आहे. त्यांनी स्वत: बांबूपासून गोष्टी बनवण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर इतर महिलांनाही त्यांनी प्रशिक्षण दिलं. या लघुपटात अभिनेत्री विभावरी देशपांडेने मीनाक्षी यांची भूमिका साकारत त्यांचं आयुष्य उत्तमरित्या पडद्यावर दाखवलं आहे. तर अभिनेत्री शुभांगी गोखले मीनाक्षी यांच्या सासूच्या भूमिकेत आहेत, ज्यांनी मीनाक्षीला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. घराबाहेरही मीनाक्षी यांची वेगळी ओळख घडवण्यात त्यांच्या सासूचंही मोठं योगदान आहे. आपली आवड आणि पॅशन जोपासणाऱ्या महिलांचं यश साजरी करणारी ही मोहीम आहे.
खालील OR कोड स्कॅन करा आणि व्हिडिओ थेट पाहता येईल तुमच्या मोबाइलवर...
फिल्मबाबत बोलायचं तर, कारगिल फुड सोल्युशन्स, दक्षिण आशियाचे मार्केटिंग आणि इन्साइट्स लीडर सुबिन सिवान म्हणाले, 'या मोहिमेच्या माध्यमातून मीनाक्षीची गोष्ट जगासमोर येत आहे याचा आम्हाला आनंद आहे. स्वत:च्या पॅशनचा पाठपुरावा करणं आणि स्वत:चं म्हणणं ठामपणे मांडणं असे अग्रेसर विचार महिलांमध्ये रुजवण्यासाठी एक ब्रँड म्हणून आम्ही सक्षम आहोत. या लघुपटाचा हेतू देशभरातील महिला आणि गृहिणींना प्रोत्साहन देणे हा आहे. गृहिणींनी स्वत:लाच 'आज क्या बनना चाहती हो?' असा प्रश्न विचारून बघितला पाहिजे.
ऑगस्टमध्ये मराठी शो 'कौन बनेगा करोडपती'च्या एपिसोडमध्ये हा लघुपट दाखवण्यात आला. यावेळी रिअल आणि रील कलाकार मीनाक्षी वाळके आणि विभावरी देशपांडे यांनी हॉटसीटवर स्पर्धक म्हणून हजेरी लावली.