"1984मध्ये काय झालं ते सोडा, तुम्ही पाच वर्षांत काय केलं सांगा"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 07:15 PM2019-05-09T19:15:33+5:302019-05-09T19:18:01+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्लीः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, तुम्ही नेहमीच खोटं बोलता, आज आमच्याकडे खोटे बोलले, उद्या तुमच्याशी खोटे बोलतील, 1984सालातलं काय सांगताय, तुम्ही पाच वर्षांत काय केलं सांगा, 1984मध्ये झालं ते झालं, पण तुम्ही काय केलं ते सांगा, तुम्ही नोकऱ्या उत्पन्न करण्याचं आश्वासन दिलं म्हणून तुम्हाला मतदान केलं. पण तुम्ही कोणत्याही नोकऱ्या उत्पन्न केलेल्या नाहीत. आम्ही 2 हजार स्मार्ट सिटी निर्माणासाठी मतदान केलं. तुम्ही तेसुद्धा केलं नाही. मग तुम्ही पाच वर्षांत काय केलं. तुम्हीही काहीही केलेलं नाही. कधी इथे फेकता, तर कधी तिथे फेकता, तुम्ही फक्त फेकाफेकीची काम केली आहे, असं सॅम पित्रोदा म्हणाले आहेत. मोदी यांनी नुकतेच उत्तर प्रदेशातील एका जाहीरसभेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल अवमानकारक विधान केले होते. त्या विधानाचा निषेध या पत्रकाद्वारे करण्यात आला होता. त्यासंबंधीची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी ट्विटरद्वारे दिली होती.
#WATCH Sam Pitroda: Ab kya hai '84 ka? Aapne kya kiya 5 saal mein, uski baat kariye. '84 mein hua to hua. Aapne kya kiya? You were voted to create jobs. You were voted to create 200 smart cities. Aapne wo bhi nahi kiya. Aapne kuch nahi kiya isliye aap yahan wahan gup lagate hain. pic.twitter.com/9SMMUW5Hll
— ANI (@ANI) May 9, 2019
खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणांमधून राजीव गांधींवर करत असलेल्या टीकेलाही काँग्रेस जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. उत्तर प्रदेशमधल्या प्रतापगडमध्ये झालेल्या रॅलीदरम्यान प्रियंका गांधींनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा पंतप्रधान मोदींना लक्ष्य करत म्हणाल्या, यांच्या एवढा भित्रा आणि कमकुवत पंतप्रधान उभ्या आयुष्यात पाहिला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणं योग्य समजत नाही. मोदी आणि पंतप्रधान यांच्यातही जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे मोदी राजीव गांधींवर वारंवार टीका करत आहेत. मोदींनी रोजगार, जीएसटी सारख्या मुद्द्यांवर निवडणूक लढवावी, असं आव्हानही प्रियंका गांधींनी दिलं आहे.