समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची भेट घेण्यासाठी सीतापूर जेलमध्ये पोहोचले. सपा नेत्याची भेट घेतल्यानंतर अखिलेश यादव यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेल्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. अखिलेश यादव म्हणाले की, "हे सर्व आघाडीला बदनाम करण्यासाठी आणि कमकुवत करण्यासाठी आहे. मात्र इंडिया आघाडीचे सर्व सदस्य ताकदीने लढतील आणि जनतेला न्याय मिळवून देतील."
"भाजपा घाबरली आहे, त्यांना माहीत आहे की जनता त्यांना यावेळी सत्तेवरून दूर करेल. ते घाबरून कारवाई करत आहेत. ते यासाठी ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स याचा वापर करत आहे. जोपर्यंत निवडणुका आहेत, तोपर्यंत भाजपापासून सावध राहा, ते काहीही करू शकतात."
"भाजपा खोट्या खटल्यांचा वर्ड रेकॉर्ड नाही तर ब्रह्मांड रेकॉर्ड करत आहे. फक्त पीडीए जिंकेल, पीडीए एनडीएला हरवेल. सरकार पीडीएला घाबरली आहे. मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये पाठवून त्यांचा लोकशाहीत विजय होणार नाही. हे लोकशाहीला कमकुवत करत आहेत."
"शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? महागाई कमी झाली का? तरुणांना रोजगार दिला का? यूपीमध्ये लोक सुरक्षित आहेत का?, वेळ खूप मजबूत आहे आणि अशी वेळ येईल की जनता भाजपालाही धडा शिकवेल. जनता मतदान करण्याचीची संधी मिळण्याची वाट पाहत आहे. मुख्यमंत्र्यांना तुरुंगात पाठवून, बातम्यांवर नियंत्रण ठेवून ते जिंकणार नाहीत" असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.