समाजवादी पार्टीच्या नेत्याने राहुल गांधींच्या चित्रपट पाहण्याची सुहाग-रातशी केली तुलना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 05:21 PM2017-12-20T17:21:55+5:302017-12-20T17:26:50+5:30
निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चित्रपट पाहिला म्हणून भाजपाने त्यांच्यावर जोरदार आगपाखड केली.
नवी दिल्ली - निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चित्रपट पाहिला म्हणून भाजपाने त्यांच्यावर जोरदार आगपाखड केली. पण समाजवादी पार्टीचे नेते नरेश अग्रवाल यांनी मात्र राहुल यांच्या चित्रपट पाहण्याचे समर्थन केले आहे. निवडणूक निकालाच्या दिवशी एखाद्याची सुहाग-रात असेल तर, भाजपावाले बोलतील हा सुहाग-रात का साजरी करतोय ?
भाजपाची विचारसरणी इतकी संकुचित कशी ? चित्रपट पाहायचा किंवा नाही हा व्यक्तिगत विषय आहे. त्याचा निवडणुकीशी संबंध जोडणे चुकीचे असल्याचे अग्रवाल म्हणाले. हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी पीव्हीआर चाणक्यमध्ये 'स्टार वॉर्स' चित्रपट पाहिला. त्यावरुन भाजपा नेत्यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे नेतृत्व करण्याबद्दल राहुल गांधी किती गंभीर आहेत असा प्रश्न भाजपाने उपस्थित केला.
Why is BJP so narrow minded? It pertains to one's personal life. Now if someone had their 'suhaag-raat' that day, they will say 'ye suhaag-raat kyu mana raha hai?': Naresh Agrawal, SP on question about Rahul Gandhi watching a movie on #GujaratElection result day. pic.twitter.com/uNIgtilBvx
— ANI (@ANI) December 20, 2017
गुजरातने मोदींच्या विश्वासार्हतेला दिला मोठा धक्का
भाजपाला गुजरातमधील जनतेने जबरदस्त झटका दिला असून, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी यांना लक्ष्य केले. संसद भवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले की, तीन-चार महिन्यांपूर्वी आम्ही जेव्हा गुजरातमध्ये गेलो होतो, तेव्हा भाजपाशी लढणे काँग्रेसला शक्यच होणार नाही, असे आम्हाला सांगण्यात येत होते, पण तीन-चार महिन्यांत आम्ही ठोस काम केले. केवळ मीच नाही, तर अखिल भारतीय काँगेस समितीची टीम आणि गुजरातमधील पक्ष कार्यकर्ते व जनतेनेही ठोस काम केले. त्याचे परिणाम निकालांमधून सर्वांच्या समोर आले आहेत.
भाजपाला व मोदी यांना आपल्याच राज्यात जबरदस्त झटका लागला आहे. आमच्यासाठी हे चांगले निकाल आहेत. आम्ही हरलो, हे आम्हाला मान्य आहे, पण जर आणखी थोडे प्रयत्न केले असते, तर जिंकलो असतो. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील लोकांचे मी आभार मानतो.
गुजरात मॉडेलवर हल्ला करताना ते म्हणाले की, ‘मला असे लक्षात आले आहे की, मोदी यांचे जे मॉडेल आहे, ते खरे आहे, असे गुजरातचे लोक मानतच नाहीत. भाजपा व मोदी यांचे मार्केटिंग चांगले आहे, पण ते आतून पोकळ आहे. आम्ही प्रचाराच्या काळात मोदी यांना जे प्रश्न विचारले, त्यांची उत्तरे त्यांनी दिली नाहीत. निवडणुकीपूर्वी मोदी यांच्याकडे सांगण्यासारखे काही राहिले नव्हते. तीन महिन्यांत गुजरात आणि तेथील जनतेने मला खूप काही शिकविले आहे.