उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणि सपाने आपापला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. दोन्ही पक्षांनी यामध्ये मोठ मोठी आश्वासने दिली आहेत. सपाने सर्व कृषी उत्पादनांसाठी एमएसपी दिली जाणार आहे. उस उत्पादकांना १५ दिवसांच्या आत पैसे अदा केले जातील. शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज आणि व्याजमुक्त कर्ज देण्यात येईल. हा जाहीरनामा सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रसिद्ध केला.
दुचाकी वाहनांसाठी 1 लिटर, ऑटो चालकांसाठी 3 लिटर पेट्रोल दर महिन्याला मोफत दिले जाणार आहे. ऑटो चालकांना दरमहा ६ किलो मोफत सीएनजी देण्यात येणार आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण, बीपीएल कुटुंबांना 2 सिलिंडर मोफत दिले जाणार आहेत. 1090 पुन्हा मजबूत करेल, ईमेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे एफआयआरची व्यवस्था होईल. मुलींचे केजी ते पीजी पर्यंतचे शिक्षण मोफत असेल, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
12वी उत्तीर्ण मुलींना 36000 रुपये दिले जातील. समाजवादी पेन्शन योजनेत दरवर्षी 18000 रुपये पेन्शन देणार. समाजवादी कॅन्टीन आणि किराणा दुकाने स्थापन केली जातील. ज्यामध्ये अनुदानावर रेशन आणि समाजवादी थाळी 10 रुपयांना मिळेल. 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लॅपटॉप देणार, आरोग्य क्षेत्रात तिप्पट अर्थसंकल्प दिला जाईल, जो राज्याच्या अर्थसंकल्पाच्या 10 टक्के असेल. एमएसएमईसाठी स्टेट मायक्रो फायनान्स बँकेची स्थापना, एमएसएमईंना कमी दराने वीज, UP मध्ये उद्योगांसाठी सिंगल रूफ क्लीयरन्स सिस्टम, ई-ऑफिस आणि मोबाईल ऑफिसची स्थापना केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.
सर्व गावांमध्ये वाय-फाय झोन तयार केले जातील. घरपट्टी आणि मालमत्ता करातील त्रुटी दूर करणार. 300 युनिट घरगुती वीज मोफत, ग्रामीण रस्ते आरसीसी होणार. जिल्हानिहाय प्रदूषणाची विल्हेवाट लावणार.जुनी पेन्शन पद्धत लागू करणार, असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे.