लखनऊ:तालिबानच्या समर्थनासाठी केलेल्या वक्तव्याबद्दल समाजवादी पक्षाचे खासदार डॉ. शफीकुर रहमान बुर्क यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा संभल सदर कोतवालीमध्ये भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 153 A, 124 A, 295 A अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.
Afghanistan: काबूलवरुन उड्डाण घेतलेल्या विमानाच्या चाकात आढळले मानवी अवशेष
एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत दरम्यान उत्तर प्रदेश मधील संभलचे सपा खासदार डॉ. शफीकुर रहमान बर्क म्हणाले होते, 'तालिबान त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत आणि अफगाण लोकांना त्यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य हवे आहे. जेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता, तेव्हा आपला देश स्वातंत्र्यासाठी लढला. आता तालिबानला आपला देश स्वतंत्र करुन चालवायचा आहे. तालिबान ही एक अशी शक्ती आहे ज्याने रशिया आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांना त्यांच्या देशात स्थायिक होऊ दिले नाही.'
देश सोडण्यासाठी विमानाच्या पंखावर बसून जाताहेत लोक, VIDEO व्हायरल
त्यांनी असेही म्हटले होते की, 'हा तालिबानचा अंतर्गत विषय आहे. अफगाणिस्तानचे स्वातंत्र्य ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. अमेरिका अफगाणिस्तानवर का राज्य करेल? तालिबान तेथे एक शक्ती आहे आणि अफगाणिस्तानच्या लोकांना त्याच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य हवे आहे.' या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी बर्क यांच्यावर निशाणा साधला होता. 'पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांमध्ये कोणताही फरक नाही,' अशी टीका त्यांनी केली होती.