शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात शुभावती शुक्ला निवडणुकीच्या मैदानात, सपा उमेदवारांची नवीन यादी जाहीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 7:08 PM

Uttar Pradesh Assembly Elections 2022 : आझमगडच्या मुबारकपूर मतदारसंघातून अखिलेश यादव यांना तिकीट देण्यात आले आहे. अखिलेश यादव यांनी 2017 मध्येही याच जागेवरून निवडणूक लढवली होती.

लखनऊ : समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी मंगळवारी आगामी विधानसभा निवडणुकीत (UP Assembly Elections 2022) 24 उमेदवारांची नवीन यादी (SP Candidate New List) जाहीर केली. या यादीत भाजपचे माजी उमेदवार दिवंगत उपेंद्र दत्त शुक्ला यांच्या पत्नी शुभावती शुक्ला (Shubhawati Shukla) यांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांच्या विरोधात गोरखपूर सदर मतदारसंघातून (Gorakhpur Sadar Seat) उमेदवारी देण्यात आली आहे. 

याशिवाय, आझमगडच्या मुबारकपूर मतदारसंघातून अखिलेश यादव यांना तिकीट देण्यात आले आहे. अखिलेश यादव यांनी 2017 मध्येही याच जागेवरून निवडणूक लढवली होती. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या  नावामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी त्यांचा संबंध नाही. समाजवादी पार्टीच्या नव्या यादीत पाचव्या, सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात शुभवती शुक्ला यांना तिकीट देण्यात आले आहे. 

दरम्यान, दिवंगत उपेंद्र दत्त शुक्ला यांच्या कुटुंबाने काही दिवसांपूर्वी समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. उपेंद्र दत्त शुक्ला यांची पत्नी शुभवती शुक्ला यांच्यासोबत अरविंद शुक्ला आणि अमित शुक्ला हे देखील समाजवादी पार्टीमध्ये सामील झाले आहेत. आता समाजवादी पार्टीने त्यांना योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. याशिवाय, बलिया येथून नारद राय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सात टप्प्यात विधानसभा निवडणूकदरम्यान, यावेळी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी सात टप्प्यांत निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. उत्तर प्रदेशामध्ये 10 फेब्रुवारी रोजी राज्याच्या पश्चिम भागातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांवर मतदान होऊन विधानसभा निवडणुकीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर 14 फेब्रुवारीला दुसऱ्या टप्प्यात 55 जागांसाठी, 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यात 59 जागांसाठी, 23 फेब्रुवारीला चौथ्या टप्प्यात 60 जागांसाठी, 27 फेब्रुवारीला पाचव्या टप्प्यात 60 जागांसाठी, 3 मार्चला सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी आणि 7 मार्चला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 54 जागांसाठी मतदान होणार आहे.

...यांना मिळाली उमेदवारीविश्वनाथगंज : सौरभ सिंगराणीगंज : आरके वर्माफाफामऊ : अन्सार अहमदमेहनौन: नंदिता शुक्लातरबगंज : रामभजन चौबेमनकापूर : रमेशचंद्र गौतमगौरा : संजय कुमारहर्रेया : त्र्यंबक पाठकमेहंदावळ : जयराम पांडेखलीलाबाद : अब्दुल कलामनौतनवा: कौशल सिंगसिसवां : शुशील टेबरीवालपनियरा : कृष्णभान सिंह सैंथवारगोरखपूर सदर : शुभवती शुक्लापदरौना: विक्रम यादवरुद्रपूर : प्रदीप यादवसगडी : एच.एन.पटेलमुबारकपूर : अखिलेश यादवमोहम्मदाबाद गोहना : वैजनाथ पासवानबलिया नगर : नारद रायमडियाहूं : सुषमा पटेलवाराणसी दक्षिण : किशन दीक्षितसेवापुरी : सुरेंद्रसिंग पटेलछानबे : कीर्ती कोल

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथAkhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Samajwadi Partyसमाजवादी पार्टी