मध्य प्रदेशात बसपानंतर समाजवादी पार्टीचा आघाडीस नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2018 02:32 AM2018-10-07T02:32:35+5:302018-10-07T02:32:53+5:30

बसपानंतर समाजवादी पार्टीनेही काँग्रेसपासून अंतर राखत शनिवारी घोषणा केली की, मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक आपण काँग्रेससोबत लढणार नाही.

 Samajwadi Party's alliance with the ruling party in West Bengal | मध्य प्रदेशात बसपानंतर समाजवादी पार्टीचा आघाडीस नकार

मध्य प्रदेशात बसपानंतर समाजवादी पार्टीचा आघाडीस नकार

Next

लखनौ : बसपानंतर समाजवादी पार्टीनेही काँग्रेसपासून अंतर राखत शनिवारी घोषणा केली की, मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक आपण काँग्रेससोबत लढणार नाही.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांकरिता काँग्रेससह जागावाटप व त्यासाठी समझोता करण्यासाठी आम्ही खूप प्रतीक्षा केली. त्यांनी खूप विलंब केला आहे. काँग्रेसने खूपच हटवादी भूमिका घेतली आहे, असा आरोप सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला. मध्यप्रदेशातील निवडणुकीसाठी आता आम्ही गोंडवाना गणतंत्र पार्टी आणि बसपासोबत चर्चा करणार आहोत. छत्तीसगडमध्येही गोंडवाना गणतंत्र पार्टीसोबत चर्चा सुरू आहे.
यादव यांनी असाही इशारा दिला की, अशा प्रकारचा विलंब महाआघाडीसाठी धोका ठरू शकतो.

Web Title:  Samajwadi Party's alliance with the ruling party in West Bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.