पूनम अपराज
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे २६ ऑक्टोबरपर्यंत तक्रार केली. त्यांनतर आज केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने गृह मंत्रालयाचे सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त, राज्य सरकारचे मुख्य सचिव यांना नोटीस पाठवली आहे. त्यांना कारवाईचा अहवाल सात दिवसांत केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने सादर करण्याची विनंती केली आहे.
तसेच आयोगाला विहित वेळेत तुमच्याकडून उत्तर न मिळाल्यास, आयोग भारतीय राज्यघटनेच्या कलम ३३८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या दिवाणी न्यायालयांच्या अधिकारांचा वापर करू शकतो आणि तुम्हाला वैयक्तिकरित्या किंवा एखाद्या व्यक्तीस आयोगासमोर हजर राहण्यासाठी समन्स जारी करू शकतो, असे देखील नोटिशीत आयोगाने म्हटले आहे.
समीर वानखेडे यांनी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने केलेल्या तक्रारीत आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला त्रास दिला जात आहे अशी तक्रार समीर वानखेडे यांनी दिली आहे. मागासवर्गीय असल्याने आपल्यावर खोटे आरोप केले जात आहेत. नागरी सेवा उत्तीर्ण होताना समीर वानखेडेंनी दाखवलेले जात प्रमाणपत्र हे खरे असून बदनामी करण्यासाठी कटकारस्थान रचले जात आहे अशी तक्रार त्यांनी केली आहे.
आपण नागरी सेवेदरम्यान सादर केलेली प्रमाणपत्रे ही योग्य असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करण्यात आलेली नाही. यामुळे जे आरोप केले जात हे त्यामुळे त्रास होत असल्याची तक्रार समीर वानखेडे यांनी मागासवर्गीय आयोगाकडे दिली आहे. यासंदर्भात समीर वानखेडे यांनी जे खरे आहे ते समोर आणावे आणि योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारची विनंती केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे केली आहे.