शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

सॅमसंग Galaxy S8, Galaxy S8+ भारतात लॉन्च

By admin | Published: April 19, 2017 5:13 PM

सॅमसंग कंपनीचे बहुचर्चित गॅलक्सी एस 8 आणि गॅलक्सी एस 8 प्लस हे दोन स्मार्टफोन भारतात दाखल झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - सॅमसंग कंपनीचे बहुचर्चित गॅलक्सी एस 8 आणि गॅलक्सी एस 8 प्लस हे दोन स्मार्टफोन भारतात दाखल झाले आहेत.  
दिल्ली येथील एका आयोजित कार्यक्रमात सॅमसंग गॅलक्सी एस 8 आणि गॅलक्सी एस 8 प्लस या स्मार्टफोनचे लॉन्चिंग करण्यात आले. सध्या या दोन्ही स्मार्टफोनची प्री-ऑर्डर फ्लिपकार्डवर ऑनलाइन करता येणार असून पाच मे नंतर भारतीय मोबाईल बाजारपेठेत दाखल होणार आहेत.
सॅमसंग गॅलक्सी एस 8 ची किंमत 57,900 रुपये आहे, तर सॅमसंग गॅलक्सी 8 प्लसची किंमत 64,900 रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे या दोन्ही स्मार्टफोनची अमेरिकेपेक्षा भारतात जास्त किंमत आहे. अमेरिकेत सॅमसंग गॅलॅक्सी एस 8 ची 720 डॉलर्स (46,700 रुपये) आणि सॅमसंग गॅलक्सी 8 प्लसची 840 डॉलर्स (54,500 रुपये) इतकी आहे.
दोन्ही स्मार्टफोन मिडनाईट ब्लॅक, कोरल ब्लू आणि मॅपल गोल्ड कलरमध्ये उपलब्ध आहेत. तसेच, या दोन्ही स्मार्टफोनमध्ये सॅमसंगने आपला Exynos 8895 प्रोसेसर लावला आहे. या प्रोसेसरमध्ये  2.35 GHz चा  क्वॉड कोअर मॉड्यूल बसविण्यात आले आहे. तसेच दोन्ही स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.
याचबरोवर 256 जीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्ड वापरता येणार आहे. गॅलक्सी एस8 आणि एस8 प्लसमध्ये १२ मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.  तसेच, गॅलक्सी एस-8 मध्ये 3000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर एस 8 प्लसमध्ये 3500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
दरम्यान, मार्च 2016 मध्ये कंपनीने सॅमसंग गॅलॅक्सी एस 7 आणि सॅमसंग गॅलॅक्सी एस 7 एग्ज हे दोन स्मार्टफोन भारतात लॉंच केले होते. त्याला मिळालेल्या यशानंतर सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलॅक्सी एस 8 आणि गॅलॅक्सी एस 8 प्लस स्मार्टफोन भारतीय बाजारात आणले आहेत.