उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीयोगी आदित्यनाथ यांनी राजस्थानच्या जालौर येथे मोठं विधान केलं आहे. येथील निलकंठ महादेव मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते आले होते. यावेळी, बोलताना मुख्यमंत्री योगी यांनी सनातन धर्म हा देशाचा राष्ट्रीय धर्म असल्याचं म्हटलं. या धार्मिक कार्यक्रमात ज्याप्रकारे जाती, धर्म आणि पंथ यातील भेदभाव विसरुन आपली एकता दिसून आली. आपल्या दैनंदिन जीवनातही आपण सर्वांना याचा स्विकार करायला हवा. सनातन धर्म हा आपला राष्ट्रीय धर्म आहे, असे योगींनी यावेळी म्हटले.
आपण सर्वांनी आपल्या व्यक्तीगत स्वार्थातून पुढे जात ह्या राष्ट्रीय धर्म कार्यक्रशी जोडले जातो. आपला देश सुरक्षीत राहावा, आपल्या मानबिंदुंची पुर्नस्थापना व्हावी आणि गो-ब्राह्मणांची रक्षा होईल, यासाठी आपण एकत्र येतो, असे योगींनी म्हटले आहे. योगींच्या या विधानानंतर एका दिवसांनी काँग्रेस नेत्याने पलटवार केला आहे. काँग्रेस नेते उदीत राज यांनी म्हटले की, याचा अर्थ असा झाला की, शीख, जैन, बौद्ध, निरंकार, ईसाई आणि मुस्लीम धर्म संपुष्टात आले आहेत.
दरम्यान, यापूर्वीही योगी आदित्यनाथ यांनी जालौर येथे केलेलं विधान चांगलंच चर्चेत होतं. जर कुठल्या कालखंडात आपल्या धर्माला अपवित्र करण्यात आलं असेल तर, त्याच्या पुनर्स्थापना करण्याचे अभियान सुरू करायला हवे. या अभियानाची सुरुवात अयोध्येत तब्बल ५०० वर्षांनी दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यातून आणि अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या भव्य मंदिराच्या निर्माणातून ही सुरुवात दिसत असल्याचं योगींनी म्हटले.