शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

सनातन ही दहशतवादी संघटना - आशिष खेतान

By admin | Published: June 11, 2016 8:13 AM

सनातन ही एक दहशतवादी संघटना असून हिंदू समाजावरील एक कलंक आहे अशी टीका आशिष खेतान यांनी केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मास्टरमाईंड डॉ. वीरेंद्र तावडेला झालेल्या अटकेनंतर आता गुप्तचर संस्थांनी दाभोलकरांच्या फरार मारेक-यांचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे नेते आशिष खेतान यांची ट्विटरवरून केली आहे. तसेच 'सनातन ही एक दहशतवादी संघटना असून हिंदू समाजावरील एक कलंक आहे' अशी टीकाही खेतान यांनी केली.
(डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी पहिली अटक)
  •  
  • डॉ. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) काल (शुक्रवार) अटक केली. दाभोलकर हत्या प्रकरणातील ही पहिलीच अटक आहे. विरेंद्र तावडे हा कान-नाक-घसा तज्ज्ञ आहे. त्याचा पनवेलजवळील कळंबोली येथे दवाखाना आहे. तावडे याचे पनवेलजवळील सनातनच्या आश्रमाजवळच कल्पतरू सोसायटीमध्ये घर आहे. तो हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता आहे. १ जून रोजी सीबीआयने पुण्यातील सारंग अकोलकर आणि तावडे यांच्या घरावर छापे टाकले होते. पुण्याच्या सीबीआय न्यायालयातून सर्च वॉरंट मिळाल्यानंतर तावडे याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये काही संशयास्पद वस्तू सापडल्या होत्या. त्याचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला होता. तसेच अकोलकर आणि तावडे या दोघांचा ई-मेलवरून संपर्क होता, असे तपासात दिसून आले होते.  छाप्यानंतर सीबीआयकडून तावडेला चौकशीसाठी बोलावण्यात येत होते. शुक्रवारी चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 
(डॉ.दाभोलकरांच्या खुन्यांचा लागला शोध? CBIचे पुणे, पनवेलमध्ये छापे)
 
याच पार्श्वभूमीवर 'आप'चे नेते आशिष खेतान यांनी काही ट्विटसच्या माध्यमातून याप्रकरणावर भाष्य केले आहे. 'सनातनने उदारमतवादी व धर्मनिरपेक्ष लोकांची एक यादी बनवली असून त्यांचा काटा दूर करण्याचा कट आखला आहे. सनातन ही एक दहशतवादी संघटना असून ती हिंदू समाजावरील एक बट्टा आहे. तावडेच्या अटकेमुळे याप्रकरणी न्याय मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणातील सीडी सादर करण्यात आल्या होत्या, मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात युपीए सरकार अपयशी ठरले' असेही खेतान म्हणाले. 
 
यापूर्वीही खेतान यांनी डॉ. दाभोलकर यांची हत्या सनातन संस्था व त्यांच्याशी संलग्न असलेल्या हिंदू जनजागरण समितीनेच केली आहे, असा दावा केला होता. राजकारणातील उजव्या घटकांचा समावेश असलेल्या कॉंग्रेस पक्षाने दाभोलकर प्रकरणाची क्रूर चेष्टा केली, अशी टीका करतानाच सनातन संस्थेने गोवा व महाराष्ट्रामध्ये काही बॉंबस्फोट घडविल्याचा आरोपही खेतान यांनी केला होता.