उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्याच आठवड्यात राजस्थानच्या जालौर येथे मोठं विधान केलं होतं. सनातन धर्म हा देशाचा राष्ट्रीय धर्म असल्याचं म्हटलं होतं. आता, शंकराचार्य स्वामी निश्चलानंद यांनीही सनातन धर्माची माहिती देताना सनातन धर्मच इतिहास असल्याचं म्हटलय. मोहम्मद पैंगबर आणि येशू ख्रिस्त यांचे पूर्वजही सनातनी हिंदूच होते, असा दावा शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती स्वामींनी केला आहे. त्यामुळे, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून या विधानावरुन वाद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भुवनेश्वरमध्ये मंगळवारी एका कार्यक्रमासाठी शंकराचार्य आले होते, त्यावेळी बोलताा त्यांनी हे सतानत धर्माची महती सांगताना वरील विधान केले. तसेच, मंदिरे आणि मठांवर सरकारचे नियंत्रण नसावे आणि प्रत्येक ठिकाणी विकासकामांसाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही, असेही स्वामींनी म्हटले.
दरम्यान, पुरीच्या रत्न भंडाराच्या हरवलेल्या चावीबाबत विचारले असता, ओडिशा सरकार आणि जगन्नाथ मंदिर प्रशासनाने मंदिरासंदर्भात कोणत्याही मुद्द्यावर कधीही चर्चा केली नाही. रत्न भंडारच्या प्रकरणामध्ये मी हस्तक्षेप का करू, असं स्वामींनी स्पष्ट केले.
धीरेंद्र शास्त्रींचं समर्थन
शंकराचार्य स्वामींनी बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचं समर्थन केलं होतं. बागेश्वर बाबा काहीही चुकीचे करत नसून त्यांच्यामुळे अनेक लोक सनातन धर्मात राहिले आहेत, असे स्वामींनी म्हटले. तसेच, धीरेंद्र शास्त्री यांनी त्यांना आश्वासन दिले नसते तर यातील अनेकांनी आतापर्यंत ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारला असता, असंही त्यांनी सांगितलं होतं.