वाळूज ७
By admin | Published: June 25, 2015 11:51 PM
दरोड्याचा प्रयत्न फसला
दरोड्याचा प्रयत्न फसलासिडको वाळूज महानगर : घातक शस्त्रांसह सात दरोडेखोर जेरबंद वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरात दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या सात दरोडेखोरांना बुधवारी रात्री एमआयडीसी वाळूज पोलिसांनी सिडको परिसरात शिताफीने अटक केली. या दरोडेखोरांच्या ताब्यातून तलवार, चाकू व घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.बुधवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर थोरात, सहायक निरीक्षक राजपूत, पोहेकॉ.परमेश्वर पायगव्हाणे, पोहेकॉ.विलास वैष्णव, पोकॉ.किशोर काळे, पोकॉ.महेंद्र अंभोरे, पोकॉ.बाबासाहेब काकडे आदींचे पथक सिडको वाळूज महानगरात रात्रीची गस्त घालत होते. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास पाण्याच्या टाकीजवळ काही संशयित अंधारात लपून बसले होते. पोलिसांचे पथक पाहताच या संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळाला वेढा घालून किरण गिरी (२४), संतोष धांडे (२८), शिवा लोहकरे, संतोष साळुंके (सर्व रा. रांजणगाव शेणपुंजी), गौतम साळवे (३७ रा.हर्सूल), दीपचंद काबरा (२८) व गोरख काळे (१९ दोघेही रा.जोगेश्वरी) या सात संशयितांना ताब्यात घेतले. या पकडलेल्या संशयितांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून एक तलवार, एक चाकू, लोखंडी रॉड, एक मोबाईल व दरोडा टाकण्याचे साहित्य आढळले. या सात जणांनी आपण सिडको वाळूज महानगरात दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली दिली. या सात दरोडेखोरांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एमआयडीसी वाळूज ठाण्यात या दरोडेखोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजपूत करीत आहेत.अलगद सापडला..... ! गौतम साळवे हा या टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. गौतमच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाया लक्षात घेऊन त्यास काही दिवसांपूर्वी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तो तडीपारी आदेशाचे उल्लंघन करून आपल्या साथीदारांच्या मदतीने सिडको वाळूज महानगरात दरोडा टाकण्यासाठी आला अन् अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला.