वाळू वाहतूक उठली शिवाजीनगरातील नागरिकांच्या जीवावर
By admin | Published: January 16, 2017 12:54 AM
जळगाव : खेडी गिरणापात्रातून उत्खनन करून सर्रासपणे वाळूची चोरटी वाहतूक चोरी आहे़ शिवाजीनगरातील दररोज दोनशेवर डम्पर, ट्रॅक्टरातून होत असलेल्या वाळू वाहतुकीमुळे धुळ उडणे, भरधाव वाहनांमुळे लहान मुलांच्या अपघाताची भिती, रस्त्याची दुरवस्था आदी समस्यांमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत़ याविरोधात अनेकदा आंदोलने झाली़ आंदोलनानंतर थातूरमातूर कारवाई करून प्रशासनाकडून मोहिम राबविल्याचा कांगावा करण्यात येतो़ विशेष म्हणजे वाळू माफियांकडून कर्मचार्यांना मारहाण होईलपर्यंत घटना घडूनही प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे़ या वाळू वाहतुकीमुळे एखादी दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल येथील रहिवाश्यांमधून उपस्थित होत आहे़
जळगाव : खेडी गिरणापात्रातून उत्खनन करून सर्रासपणे वाळूची चोरटी वाहतूक चोरी आहे़ शिवाजीनगरातील दररोज दोनशेवर डम्पर, ट्रॅक्टरातून होत असलेल्या वाळू वाहतुकीमुळे धुळ उडणे, भरधाव वाहनांमुळे लहान मुलांच्या अपघाताची भिती, रस्त्याची दुरवस्था आदी समस्यांमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत़ याविरोधात अनेकदा आंदोलने झाली़ आंदोलनानंतर थातूरमातूर कारवाई करून प्रशासनाकडून मोहिम राबविल्याचा कांगावा करण्यात येतो़ विशेष म्हणजे वाळू माफियांकडून कर्मचार्यांना मारहाण होईलपर्यंत घटना घडूनही प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचे चित्र आहे़ या वाळू वाहतुकीमुळे एखादी दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येईल का? असा संतप्त सवाल येथील रहिवाश्यांमधून उपस्थित होत आहे़शिवाजीनगरातील रस्त्यांवरून रात्री दहा वाजेपासून ते सकाळी सात वाजेपर्यंत सर्रासपणे वाळू वाहतूक सुरू असते़ दिवसभर काम व रात्री डम्पर, ट्रॅक्टरांच्या आवाजामुळे नागरिकांच्या झोपेचा खोळंबा होत आहे़ या डम्पर, ट्रॅक्टरमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून भरधाव वेगाने वाहन जावून धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे़ लहान मुले रस्त्यावर खेळतात़ त्यामुळे भरधाव जाणार्या वाळूच्या वाहनाखाली येवून दुर्घटनेचा धोका आहे़ त्यामुळे मुलांना दिवसभर घरात कोंडून ठेवावे लागते़ आंदोलनानंतर कारवाईचे पोकळ आश्वासने१) साळुंखे चौकात या वाळू वाहतुकीविरोधात नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले होते़ यावेळी तत्कालीन डीवाएसपी यांना प्रत्यक्ष घटनास्थळ गाठून नागरिकांची समजूत काढावी लागली होती़ वाहतूक पोलीस नियुक्त करण्याचे आश्वासन मिळाले़ मात्र चार ते पाच दिवस वाहतूक पोलीस दिसला़ यानंतर डीवाएसपींचे आश्वासन हवेत विरले़२)जिजाऊ चौकात येथील गणेश कोळी यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी चौकात वाहने अडवून धरली होती़ त्यावेळी तहसीलदारांना मध्यस्थी करावी लागली होती़ तहसीलदारांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर नागरिकांनी रस्ता मोकळा केला होता़ यानंतर एक ते दोन ट्रॅक्टर पकडून तहसील विभागाने कारवाईचा कांगावा केला़ यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थैच असल्याचे चित्र आहे़३)येथील रहिवाश्यांनी तहसीलदार, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांना निवदेन दिले़ त्यांच्याकडून कारवाई सुरू असून मोहिम राबविण्याबाबतची आश्वासने मिळाली़ मात्र प्रत्यक्षात कारवाई झाली नाही़ नुकतेच चार ते पाच दिवसांपूर्वी येथील नगरसेविका गायत्री शिंदे यांनी जिल्हाधिकार्यांना या वाळू वाहतुकीविरोधात निवेदन दिले़ मात्र अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही