गोवा कथामालेची २४ रोजी सांगेत्
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM
ा अंतिम कथाकथन स्पर्धा
ा अंतिम कथाकथन स्पर्धामडगाव : गोवा प्रदेश साने गुरुजी कथामाला, कला व संस्कृती संचालनालय पणजी, कथामाला केंद्र सांगे, भाग शिक्षणाधिकारी सांगे व युनियन हायस्कूल सांगे व इतर संस्थाच्या सहकार्याने राज्य कथाकथन स्पर्धा दि. २४ डिसेंेबर रोजी गोव्यातील १८ केंद्रातून आलेल्या निवडक ११८ विजयी स्पर्धक विद्यार्थ्याची अंतिम क थाकथन राज्य स्पर्धा संपन्न होणार आहे. प्राथमिक गट, उच्च प्राथमिक गट, माध्यमिक गट, उच्च माध्यमिक गट विद्यार्थ्याची स्पर्धा घेऊ न प्रत्येकी पाच क्रमांकाना पुस्तक रुपाने व रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व गटातील प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकांना फिरते चषक देण्यात येतील. स्पर्धा सांगे येथील युनियन हायस्कुल पटांगणात होणार आहे.दि. २४ डिसंेंबर रोजी उदघाटन समारंभ सावर्डे मतदार संघाचे आमदार गणेश गावकर यांचे हस्ते होणार आहे. हुतात्मा रामचंद्र नेवगी ट्रस्ट डिचोली मार्फत कथामाला कार्यकत्यांचा सन्मान चिन्ह देऊन सुरेश राणे(पेडणे), पुष्पा गायतोंडे (मडगाव) यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळयानंतर चारही गटांच्या कथाकथन स्पर्धा १ वाजेपर्यंत होणार आहेत. यावेळी आमदार सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते पारितोषिक होणार आहे तसेच प्रभाकर ढगे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सर्व स्पर्धक, विद्यार्थी, शिक्षक पालक स्नेहांकित यानी सहकार्य द्यावे असे आवाहन कथामाला अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी यानी केले आहे.(प्रतिनिधी)