- योगेश पांडे
रायपूर : सहसा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कुठल्याही निवडणुकीत प्रत्यक्षपणे सक्रिय प्रचार करण्यात येत नाही. छत्तीसगडच्या निवडणुकीतदेखील हेच चित्र असले तरी स्वयंसेवकांकडून वेगळ्या पद्धतीने प्रचाराची धुरा खांद्यावर घेण्यात आली आहे. मतदारांनी ‘नोटा’चा वापर करू नये तसेच संघ परिवाराशी संबंधित असलेल्या कुटुंबातून शंभर टक्के मतदान व्हावे, असे आवाहन स्वयंसेवकांकडून करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.२०१३ साली झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपाला ४९ जागा मिळाल्या होत्या. त्यातील २० जागांवर भाजपाचे उमेदवारांचे मताधिक्य हे पाच टक्के किंवा त्याहून कमी होते. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांत अशा जागांची संख्या १८ इतकी होती. तर दुसºया टप्प्यात सहा जागांवर भाजपाचे उमेदवार कॉंग्रेस किंवा बसपाच्या उमेदवारांकडून अवघ्या पाच टक्के किंवा त्याहून कमी मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. मागील १५ वर्षांपासून भाजपा छत्तीसगडमध्ये सत्तेत आहे. त्यामुळे सहाजिकच या सर्व जागांवर यंदा मते थोडीदेखील इकडे तिकडे गेली तर निकालांचे चित्र पालटण्याची शक्यता आहे. यातील बºयाचशा जागांवर अपक्षांना पडलेली मते तसेच ‘नोटा’चे प्रमाण हे लक्षणीय होते.भाजपाच्या उमेदवारांसाठी थेट मतदान करा असे थेट आवाहन करण्याचे संघाकडून टाळण्यात येत आहे. परंतु देश व राज्याच्या प्रगतीसाठी चांगल्या व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे, तसेच मतदान करणे किती आवश्यक आहे व एका मतामुळे काय फरक पडू शकतो इत्यादी मुद्यांवर भर देण्यात येत आहे.या मोहिमेला संघ परिवारासोबतच समाजातील सर्व स्तरातील कुटुंब, मोहल्ला पातळीवर पोहोचविणे सुरू झाले आहे.
या जागांवर भाजपाला चिंता(२०१३ मधील विजयातील मार्जिन)तखतपूर (०.४३ %), बैकुंठपूर (०.९५ %), कवर्धा (१.२१ %), राजीम (१.६४ %), धारसिवा (१.६८ %), मुंगेली (१.९४ %), दुर्ग-ग्रामीण (२.३४ %), पठलगाव (२.५३ %), रायपूर शहर-उत्तर (३.३३ %), पंडरिया (३.७३ %), भरतपूर-सोनहात (४.०१ %), बसना (४.०४ %), खल्लारी (४.०५ %), चांद्रपूर (४.१४ %), बेलतरा (४.६० %), रायपूर शहर-पश्चिम (४.६६ %), मनेंद्रगड (४.७३ %), लोरमी (४.८० %),या जागांवर दुसºया स्थानी (२०१३ मधील पराभवाचे मार्जिन)रायपूर सिटी ग्रामीण (१.२८ %), जैजैपूर (१.८२%) कोटा (३.७० %), दुर्ग-शहर (४.१२ %), भटगाव (४.६७ %),