11 ग्रामपंचायतींवर शेकापचे वर्चस्व सांगोला तालुका : चार ग्रामपंचायती राष्ट्रवादी तर एक ग्रामपंचायत शिवसेनेकडे
By admin | Published: August 31, 2015 12:24 AM
30पंड03
30पंड03बामणी (ता. सांगोला) ग्रामपंचायतीवर शेकापच्या सरपंचाची निवड झाल्यानंतर जल्लोष करताना कार्यकर्ते.सांगोला : तालुक्यातील 16 पैकी 11 ग्रामपंचायतींवर शेकापने वर्चस्व मिळविले असून, 4 राष्ट्रवादीकडे तर 1 ग्रामपंचायत शिवसेनेला मिळाली आहे. सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत शेकापचाच वरचष्मा राहिला आहे. पहिल्या टप्प्यात सांगोला तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या मुदती सोमवार, 31 ऑगस्ट रोजी संपणार असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी र्शीकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी या निवडी करण्यात आल्या. 16 ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज आल्याने निवडी बिनविरोध झाल्या. पक्षनिहाय 16 ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंचांची नावे पुढीलप्रमाणे- आलेगाव- सरपंच लक्ष्मण यादव (शेकाप), उपसरपंच विष्णू शिवाजी कांबळे, चोपडी- सरपंच सुमन केंगार (शेकाप), उपसरपंच अशोक बाबर, नाझरे- सरपंच विजय सूर्यकांत देशमुख (शेकाप), उपसरपंच कविता बनसोडे, सोमेवाडी- सरपंच रंजना खांडेकर (शेकाप), उपसरपंच विष्णू विटेकर, देवळे-सरपंच कुसुम व्हनमाने (शेकाप), उपसरपंच प्रकाश आलदर, बामणी- सरपंच गजानन साळुंखे (शेकाप), उपसरपंच सुरेश बिचुकले, निजामपूर- सरपंच मनुबाई सुखदेव कोकरे (शेकाप), उपसरपंच लक्ष्मी लवटे, महिम-सरपंच सुमन मरगर (शेकाप), उपसरपंच दीपक रूपनर, गायगव्हाण- सरपंच स्मिता गोडसे (शेकाप), उपसरपंच रणजित कांबळे, एखतपूर- सरपंच महादेव रोकडे (शेकाप), उपसरपंच रखमाबाई बनसोडे, मेडशिंगी- सरपंच संजय रूपनर (शेकाप), उपसरपंच अनिल इंगवले, आगलावेवाडी- सरपंच वैशाली आगलावे (राष्ट्रवादी), उपसरपंच अक्षयकुमार आगलावे, तरंगेवाडी- सरपंच संपतराव तरंगे (राष्ट्रवादी), उपसरपंच महादेव सांगोलकर, संगेवाडी- सरपंच सुमन पवार (राष्ट्रवादी), उपसरपंच नंदादेवी वाघमारे, हलदहिवडी- सरपंच मनीषा चव्हाण (राष्ट्रवादी), उपसरपंच रूपाली कांबळे, वासुद- सरपंच कुसुम चंदनशिवे (शिवसेना), उपसरपंच विठ्ठल केदार अशा 16 सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडी शांततेत व बिनविरोध पार पडल्या.