"दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न, ...तर पहिल्या एका तासातच भाजपचा पराभव निश्चित झाला असता!" संजय राऊतांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 11:41 IST2025-02-08T11:40:02+5:302025-02-08T11:41:01+5:30

Delhi Assembly Election Results 2025: ...तर दिल्लीच्या निकालात पहिल्या एका तासातच भाजपचा पराभव निश्चित झाला असता, असे राऊत यांनी म्हटले आहे...

sanjay raut on delhi election result 2025 says Maharashtra pattern had been followed in Delhi too | "दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न, ...तर पहिल्या एका तासातच भाजपचा पराभव निश्चित झाला असता!" संजय राऊतांचं मोठं विधान

"दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न, ...तर पहिल्या एका तासातच भाजपचा पराभव निश्चित झाला असता!" संजय राऊतांचं मोठं विधान

दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहेत. आतापर्यंत आलेल्या निकालात भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठी आघाडी मिळताना दिसत आहे. तर आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का अथवा झटका बसताना दिसत आहे. यातच, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. "दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न लागू करण्यात आला असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. विषेश म्हणजे, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अभूतपूर्वी विजयानंतरही, विरोधी पक्ष भाजपवर 'हेराफेरी' केल्याचा आरोप करत होते.

काल दिल्लीत, राहुल गांधी, सुप्रिया सुळे आणि मी स्वतः एक पत्रकारपरिषद केली. या पत्रकार परिषदेत, निवडणूक आयोग आणि सरकारचे निवडणुकीसंदर्भातील वर्तन कसे आहे? कशा प्रकारे मतदार याद्यांमध्ये घोटाळा होत आहे? आणि हा नवा महाराष्ट्र पॅटर्न तयार केला आहे. तर मीही काल म्हणालो की, दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न लागू करण्यात आला आहे आणि महाराष्ट्र पॅटर्न जसा आहे, त्याच पद्धतीने दिल्लीतही काम सुरू होते. निवडणूक आयोग डोळे बंद करून बसला होता. 

"...त्यामुळे कोणत्याही थराला जाऊन दिल्लीत विजय मिळविण्याचा प्रयत्न" -
मला काल विचारण्यात आले की, महाराष्ट्रत ३९ लाख मेत पाच महिन्यात वाढली, त्याचे पुढे काय होणार? यावर मी म्हणालो, हे ३९ लाख मते बिहारमध्ये शिफ्ट होतील. यातील काही दिल्लीतही आले. मात्र, पंतप्रधान  १० वर्षांपासून दिल्लीत होते. पण त्यांना दिल्ली जिंकता आली नव्हती. कदाचित त्यांची शेवटची इच्छा असेल, जी राजकारणात असते की, मी असताना दिल्ली जिंकायला हवे. त्यामुळे कोणत्याही थराला जाऊन दिल्लीत विजय मिळविण्याचा प्रयत्न होत आहे.

तर पहिल्या एका तासातच भाजपचा पराभव शिश्चित झाला असता -
अद्याप संपूर्ण निकाल आलेला नाही. काट्याची टक्कर आहे. जर आप आणि काँग्रेस एकत्रितपणे लढले असते तर, चांगले झाले असते. जर एकत्रितपणे लढले असते, तर दिल्लीच्या निकालात पहिल्या एका तासातच भाजपचा पराभव शिश्चित झाला असता, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

Web Title: sanjay raut on delhi election result 2025 says Maharashtra pattern had been followed in Delhi too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.