नवी दिल्ली - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईव्हीएम मशिनसंदर्भात राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. मतदार आणि मिळालेल्या एकूण मतदानाची संख्या यात फरक आहेत. बाब आहे. महाराष्ट्रातील काही भागांत मतदान हे कमी-जास्त झाल्याची तक्रार आहे. कालच, मला प्रकाश आंबेडकर भेटले होते, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत बोलताना म्हटले.
महाराष्ट्रातील काही भागात झालेल्या मतदान तफावतींच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींचे काय होते, याबाबत कारवाई होणार का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला होता. त्यावर, कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी उत्तर दिले. व्हीव्हीपॅटसंदर्भात अशी कुठलिही तक्रार आली नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तसेच, मतदान प्रक्रियेवेळी निवडणूक आयोगाचे अधिकारी, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनीधीही हजर असतात. त्यामुळे, तशी कुठलिही तक्रार नसून संबंधित प्रकाराबाबत विशेष स्पेसिफीक तक्रार आल्यास नक्कीच याबाबत माहिती घेऊन मी प्रश्नकर्त्यांच्या उत्तराचे समाधान करेल, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ईव्हीएम मशिनला ती प्रक्रियेतून जावं लागते, म्हणजे मशिचने उत्पादन, ऑपरेटींग आणि फायनल फंक्शनिंग असा तीन पद्धती आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ईव्हीएम संदर्भात सभागृहात चर्चा घ्यावी, अशी मागणी खासदार भुवनेश्वर कलिता यांनी विचारला केली आहे.