Kolkata Murder Case : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप असलेल्या संजय रॉयने यु-टर्न घेतला आहे. त्याची पॉलीग्राफ चाचणी व्हावी, जेणेकरून सत्य बाहेर येईल, असे त्याचे वकील कविता सरकार यांनी सांगितले. त्याने मी निर्दोष असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयला शक्य ते सर्व सहकार्य करण्यास तो तयार आहे, जेणेकरून खरा गुन्हेगार पकडता येईल, असंही वकीलांनी सांगितले.
'युद्धात भारताची भूमिका कधीच तटस्थ नव्हती, आम्ही...', पीएम मोदींचे झेलेन्स्की यांना आश्वासन
संजय रॉय याच्या वकील कविता सरकार यांनी सांगितले की, पॉलीग्राफ चाचणीसाठी संजयची संमती घेण्यात आली तेव्हा मी तिथे उपस्थित होते. त्याने चाचणीसाठी संमती दिली होती. पॉलीग्राफ चाचणी म्हणजे काय हे मी त्याला व्यक्तिशः समजावून सांगितले. यानंतर त्याने होकार दिला. त्याच्यावर हे आरोप लावण्यात आल्याने तो सध्या खूप मानसिक दबावाखाली आहे. सत्य बाहेर यावे असे त्याला वाटते.
आरोपी संजय रॉयने आता यू-टर्न घेतला
कविता सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय रॉय या गुन्ह्यात आपला सहभाग नसल्याचे सांगत आहे. त्यामुळे तो कोणत्याही चाचणीसाठी तयार आहे. या प्रकरणाच्या तपासात सर्व सहकार्य करेल. महिला डॉक्टरसोबत अत्याचाराचा आरोप असलेल्या आरोपी संजय रॉयने आता यू-टर्न घेतला आहे. त्याने अटकेनंतर त् स्वतः आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यावेळी पोलीस कोठडीत चौकशी केली असता, ‘हो, मी गुन्हा केला आहे, मला फाशी द्या’, असे सांगितले होते. आता त्याने यू-टर्न घेतला आहे.
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आरोपी संजय रॉयच्या पॉलीग्राफी चाचणीला मान्यता दिली आहे. याआधी ४ प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.संदीप घोष यांच्या पॉलिग्राफ चाचणीलाही मान्यता मिळाली आहे. यासोबतच सियालदहच्या विशेष न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.