नवी दिल्ली - राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सोशल मीडियाच्या प्लेटफॉर्मवर एन्ट्री केली आहे. नुकतेच त्यांनी ट्विटरवर अकाउंट उघडला आहे. या अकाउंटवरून एकही ट्विट करण्यात आले नसले तरी या अकाउंटला २० हजाराहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेट्विटरवर अकाउंट २०११ पासून आहेत. मात्र खुद्द मोहन भागवत हे आजपर्यंत सोशल मीडियापासून लांबच राहिले होते.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपले अधिकृतरीत्या ट्विटर अकाउंट उघडले आहेत. सद्यातरी त्यांनी फक्त राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे ट्विटर हँडलला फॉलो केले आहते. त्यांनी आपले अकाउंट उघडताच आतापर्यंत त्यांना २० हजार पेक्षा अधिक लोकांनी फॉलो केले आहेत. यात योगगुरू बाबा रामदेव, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवकसंघाचे आणखी ६ जणांनी ट्विटरवर अकाउंट उघडले आहेत. ज्यात भैय्याजी जोशी, सुरेश सोनी, कृष्ण गोपाल, वी भागय्या, अरुण कुमार आणि अनिरुद्ध देशपांडे ह्या संघाच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
याआधी २०११ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत अकाउंट उघडण्यात आले होते. ज्याला आजघडीला १३ लाखापेक्षा अधिक लोकं फॉलो करतात. संघाच्या महत्वाच्या आणि मोठ्या नेत्यांनी आजपर्यंत सोशल मीडियापासून अलिप्त राहणे पसंद केले होते. मात्र आपले विचार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सोशल प्लेटफॉर्म महत्वाचे झाले आहेत. त्यामुळेच सरसंघचालक यांनी सुद्धा सोशल मिडीयावर एन्ट्री केली असून त्यांचा पहिला ट्विट काय असणार आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत.