नवी दिल्ली- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यानंतर त्यांनी सरदार वल्लभभाई पटेलांवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. सरदार पटेल यांच्या अंगी शिवरायांचं शौर्य आणि कौटिल्याची कूटनीती होती, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. देशाच्या इतिहासात आज महत्त्वाचा दिवस असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे.ते म्हणाले, सरदार पटेल यांचा भव्य पुतळा देशाला समर्पित करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे. गुजरातच्या शेतकऱ्यांकडून या पुतळ्याच्या निर्मितीला जनआंदोलनाचं स्वरुप दिलं, त्यांच्याकडून मिळालेल्या अवजारांमुळे पुतळ्यासाठी शेकडो टन लोखंड मिळालं. सरदार साहेबांच्या आवाहनावर देशाच्या शेकडो संस्थानांनी त्याग केला, त्यांचा त्याग विसरता येणार नाही. देशातील काही लोक आमची ही मोहीम राजकारणाशी जोडू पाहतात तेव्हा आश्चर्य वाटतं. सरदार पटेल यांच्यासारख्या महापुरुषांचं कौतुक केल्यावरही आमच्यावर टीका केली जाते, महापुरुषांचं कौतुक करणं हा मोठा गुन्हा आहे काय?, असंही मोदी म्हणाले आहेत.'स्टॅच्यू ऑफ युनिटी' पाहण्यास येणाऱ्या पर्यटकांना आता सरदार सरोवर डॅम, सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगाही पाहायला मिळणार आहेत. सरदार पटेल यांनी संकल्पामुळेच लोकसेवेसारखी प्रशासकीय यंत्रणा निर्माण झाली. त्यांच्या संकल्पामुळेच काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत थेट ट्रेनची कल्पनाही प्रत्यक्षात साकारण्यात आली. सरकार वल्लभभाई पटेलांमुळेच गीरचे सिंह पाहण्यासाठी, सोमनाथमध्ये पूजा करण्यासाठी आणि हैदराबादचा चार मिनार पाहण्यासाठी आपल्याला व्हिसा घ्यावा लागत नाही.
Statue Of Unity updates
- देशातील काही लोक आमची ही मोहीम राजकारणाशी जोडू पाहतात तेव्हा आश्चर्य वाटतं. सरदार पटेल यांच्यासारख्या महापुरुषांचं कौतुक केल्यावरही आमच्यावर टीका केली जाते, महापुरुषांचं कौतुक करणं हा मोठा गुन्हा आहे काय? :