सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा ‘मेड इन चायना’, राहुल गांधी यांचे भाजपावर टीकास्त्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:21 AM2017-09-27T01:21:01+5:302017-09-27T01:21:12+5:30
गुजरातमध्ये नर्मदा नदीजवळ उभारण्यात येणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याचे काम चीनला दिल्याबद्दल, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली.
राजकोट : गुजरातमध्ये नर्मदा नदीजवळ उभारण्यात येणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्याचे काम चीनला दिल्याबद्दल, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली.
चीनमध्ये हा पुतळा तयार होत असून, कदाचित, त्यामागे ‘मेड इन चायना’ हा शिक्काही असेल आणि ही बाब देशासाठी लाजिरवाणी असेल, असे ते म्हणाले.
राहुल गांधी तीन दिवसांच्या गुजरातच्या दौºयावर आहेत. मंगळवारी त्यांनी जामनगर आणि खिजदिया या भागाचा दौरा केला. पटेल
(पाटीदार) समाजाने आरक्षणासाठी आंदोलन करताच, भाजपा सरकारने त्यांच्यावर गोळीबार केला, त्यांच्या नेत्यांना तुरुंगात टाकले, अशी टीका करून, गांधी म्हणाले की, काँग्रेस हा सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणारा पक्ष आहे.
जामनगरमध्ये राहुल म्हणाले की, गुजरातमधील भाजपा सरकार दिल्लीतील रिमोट कंट्रोलवर चालते. राज्यातील सरकार दिल्लीतून नव्हे, तर गुजरातमधूनच चालविणे गरजेचे आहे.
गुजरात दौºयात राहुल गांधी यांनी पटेल समाजाच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. तो समाज भाजपावर नाराज आहे. त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेस करीत आहे. जीएटीमुळे कापड व्यापारीही नाराज असून, त्यांच्या
काही नेत्यांनाही राहुल गांधी भेटले. (वृत्तसंस्था)
१८२ मीटर उंचीचा पुतळा
नर्मदा नदीजवळ सरदार पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात येणार असून, हा जगातील सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून हा पुतळा तयार होत असून, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना, आॅक्टोबर २०१३ मध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले होते.