कोरोना काळात सरकारी बँकांनी बंपर भरत्या सुरु केल्या आहेत. स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्टानंतर आता पंजाब नॅशनल बँकेनेही भरती काढली आहे. महत्वाचे म्हणजे आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. कोरोनाकाळामुळे अर्ज भरण्याची मुदत वाढविण्य़ात आली होती.
पंजाब नॅशनल बँकेने विविध विभागांच्या एमएमजीएस-२ आणि एमएमजीएस-३ ग्रेड/स्केलवर मॅनेजर आणि सीनियर मॅनेजरच्या पदांसाठी भरती घोषित केली आहे. या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठीचे नोटिफिकेशन सोमवारी पीएनबीने pnbindia.in या आपल्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे. या भरतीप्रक्रियेसाठीची प्रक्रिया ८ सप्टेंबरपासून सुरू झाली होती.
पात्र आणि इच्छुक उमेदवार पीएनबीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन करिअर विभागात उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन फॉर्मच्या मदतीने आपला अर्ज दाखल करू शकतात. पीएनबीने ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी २९ सप्टेंबर २०२० ही तारीख निर्धारित केली होती. मात्र, नंतर ही मुदत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्य़ात आली होती.
पंजाब नॅशनल बँकेने मॅनेजर आणि सीनिअर मॅनेजरच्या पदांसाठी स्पेशालिस्ट ऑफिसरच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर करिअर विभागात जावे लागेल. तिथे ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्म लिंकवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावर क्लीक करून उमेदवार आयबीपीएसच्या अॅप्लिकेशन पोर्टलवर जातील. तिथे उमेदवारांना आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर पासवर्डच्या मदतीने लॉगइन करून उमेदवार आपला अर्ज सबमिट करू शकतील.
पदांची माहितीमॅनेजर (रिस्क) - 160 पदेमॅनेजर (क्रेडिट) - 200 पदेमॅनेजर (ट्रेजरी) - 30 पदेमॅनेजर (लॉ) - 25 पदेमॅनेजर (आर्किटेक्ट) - 2 पदेमॅनेजर (सिविल) - 8 पदेमॅनेजर (इकोनॉमिक) - 10 पदेमॅनेजर (एचआर) - 10 पदेसीनियर मॅनेजर (रिस्क) - 40 पदेसीनियर मॅनेजर (क्रेडिट) - 50 पदेएकूण पदे - 535
या भरतीप्रक्रियेसाठी एससी, एसटी आणि पीडब्ल्यूबीडी या वर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये आहे. तर खुल्या प्रवर्गासाठीचे शुल्क ८०० रुपये आहे.