नवी दिल्ली : नवी दिल्लीमेट्रोनेमेट्रोमध्ये खाली बसणाऱ्या, कचरा फेकणाऱ्या आणि उपद्रवी प्रवाशांकडून गेल्या वर्षभरात 90 लाखांचा दंड वसूल केला आहे. यापैकी 38 लाख रुपये केवळ मेट्रामध्ये खाली बसल्याने वसूल करण्यात आल्याचे माहिती अधिकारात समार झाले आहे. मेट्रोमध्ये खाली बसणाऱ्या 20 हजार प्रवाशांना पकडण्य़ात आले. त्यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपये वसुलण्यात आले. तर एक जण मेट्रोच्या टपावरून प्रवास करताना पकडण्यात आले. त्याच्याकडे 50 रुपये दंड आकारण्यात आला. हा दंड जून 2017 ते मे 2018 या दरम्यान वसूल करण्यात आला. दिल्ली मेट्रोच्या यलो आणि ब्ल्यू लाईन अशा दोन मार्गिका आहेत. दर दिवशी या मार्गांवरून 24.2 लाख प्रवासी प्रवास करतात.
खाली बसणाऱ्यांकडून दिल्ली मेट्रोने वसूल केला 38 लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2018 4:08 PM