शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रहाची मदत, भारत-चीन सीमेवर आणखी 50 चौक्या उभारण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 2:12 PM

भारत-चीन सीमेवर आणखी 50 चौक्या उभारण्याच्या प्रस्तावावर मंत्रालय विचार करत आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले.

ठळक मुद्देलडाखमध्ये बॉर्डर पोस्टचे एक मॉडेल बनवण्यात आले असून, हे मॉडेल यशस्वी झाले तर, सर्वत्र त्याच मॉडेलची अंमलबजावणी केली जाईल.

नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवर आणखी 50 चौक्या उभारण्याच्या प्रस्तावावर मंत्रालय विचार करत आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले. अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमधल्या भारताच्या सीमा चीनला लागून आहेत. या तीन राज्यातील 25 रस्त्यांची कामे जलदगतीने सुरु असल्याची माहिती  राजनाथ सिंह यांनी दिली. चीनला लागून असणा-या सीमेवर तैनात असणा-या आटीबीपीच्या जवान आणि अधिका-यांना प्रशिक्षणा दरम्यान मंदारीन भाषा शिकवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सीमेवर तैनात असताना त्यांना भाषेच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही अशी माहिती असे राजनाथ सिंह यांनी दिली. लडाखमध्ये बॉर्डर पोस्टचे एक मॉडेल बनवण्यात आले असून, हे मॉडेल यशस्वी झाले तर, सर्वत्र त्याच मॉडेलची अंमलबजावणी केली जाईल असे राजनाथ सिंह म्हणाले. केंद्रीय गृहमंत्रालयाने आयटीबीपीला जी-सॅट उपग्रहाचा वापर करण्याचे अधिकार दिले आहेत. जी-सॅट भारताचा कम्युनिकेशन आणि टेहळणी उपग्रह आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून भारतीय सीमांवर लक्ष ठेवले जाते. आयटीबीपी जी-सॅटकडून मिळणा-या माहितीचे मुख्य केंद्र असेल असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

बीएसएफकडे बांगलादेश आणि पाकिस्तानला लागून असणा-या सीमेची जबाबदारी आहे. एसएसबी भारत-नेपाळ सीमेचे संरक्षण करते तर चीनला लागून असणा-या सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी आयटीबीपीकडे आहे. वेगवेगळया सीमांवर तैनात असलेल्या फोर्सेसाना उपग्रहांच्या माध्यमातून आता थेट माहिती मिळणार असल्याने विविध दुर्गम भागांवर लक्ष ठेवणे सोपे होईल तसेच शत्रूच्या प्रत्येक हालचाली टिपून वेळीच कारवाई करता येईल. 

चीनच्या सीमावर्ती भागात १00 नवे रस्ते बांधणारचीनने डोकलाम भागात रस्ता बांधण्याची तयारी पुन्हा सुरू करताच, भारत- चीन सीमेवरील सर्व महत्त्वाच्या खिंडींजवळ जवळपास १00 नवे रस्ते बांधण्याची रणनीती भारत सरकारकडे तयार आहे. सीमावर्ती भागात पहिल्या टप्प्यात महत्त्वाचे २५ रस्ते, तर दुस-या व तिस-या टप्यात प्रत्येकी ५0 नवे रस्ते तयार होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान